सचिन यादवकोल्हापूर : युद्धाचा परिणाम म्हणून व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे जिल्ह्यात लग्नसराईवर टांगती तलवार आहे. लग्नाच्या मुख्य काळात गॅस टंचाईमुळे काही विवाह सोहळे पुढे ढकलण्याची किंवा मेनूमध्ये बदल करण्याची वेळ केटरर्स आणि कुटुंबावर येण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी केटरर्सने सिलिंडर घेऊन येण्याची जबाबदारी ग्राहकांवर सोपविली असल्याने अधिकच कोंडी झाली आहे.लग्नसराईत केटरर्सना जेवण बनवण्यासाठी सिलिंडरची गरज भासते. मात्र, व्यावसायिक सिलिंडरच्या टंचाईमुळे अनेक केटरर्स व्यावसायिकांनी धास्ती घेतली आहे. लग्न समारंभ, वाढदिवस, सत्कार समारंभाच्या कार्यक्रमांची नोंदणी केलेल्या ग्राहकांवर सिलिंडरची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे कार्यक्रमांची नोंदणी करणाऱ्या ग्राहकांची मोठी कोंडी झाली आहे.आनंदाच्या क्षणी हे संकट उभे राहिल्याने लग्न कुटुंबातील व्यक्तींच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट पाहायला मिळत आहे.
वाचा: गॅस मिळो अगर न मिळो; आमच्याकडे ‘बायोगॅस’; ग्रामीण भागात चिंता नाही, कोल्हापूर जिल्ह्यात किती आहेत युनिट..शहरातील केटरर्सकडे वधू आणि वराकडील कुटुंबीय विचारणा करत आहेत. अगदी २०० पासून ते २ हजार लोकांपर्यंतच्या जेवणाची जबाबदारी केटरिंग व्यावसायिकांनी घेतली आहे. मात्र, त्यासाठी तितक्या मुबलक प्रमाणात व्यावसायिक किंवा घरगुती सिलिंडर उपलब्ध होतील की नाही, याची चिंता केटरर्स व्यावसायिकांना आहे. या सर्व प्रकाराने लग्न सोहळे पुढं ढकलायचे का? असा विचार काही कुटुंबीयांकडून सुरू झाला आहे.
४० हून अधिक मुहूर्तएप्रिल आणि मे अशा दोन महिन्यांत ४० हून अधिक मुहूर्त आहेत. या मुहूर्तावर जिल्ह्यात किमान दोन हजारांहून अधिक लग्न सोहळे होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात २८२ नोंदणीकृत केटरर्सजिल्ह्यात कोल्हापूर केटरर्स वेलफेअर असोसिएशनचे २८२ केटरर्स अधिकृत सभासद आहेत. ते लग्न सोहळ्यासह अन्य कार्यक्रमांची जेवणाची ऑर्डर घेतात. त्यासह, तसेच ४०० हून अधिक अन्य छोटे-छोटे केटरर्सही ऑर्डर घेतात.
दरवाढीची शक्यताकेटरर्सने जादा पैसे घेऊन गॅसची जुळवाजुळव केल्यास केटरर्स प्रती थाळीमागे १० ते २० टक्के दरवाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे लग्न सोहळ्यात उत्तम मेजवानी हवी असल्यास ग्राहकांच्या खिशाला कात्रीही लागू शकते. मात्र, सिलिंडर उपलब्ध झालेच नाही तर केटरर्सना मोठा फटका बसणार आहे. त्यांच्याकडील कामगारांच्या रोजगाराचा प्रश्नही निर्माण होणार आहे.
शिष्टमंडळ आज पुरवठा अधिकाऱ्यांना भेटणारकोल्हापूर जिल्हा केटरर्स वेलफेअर असोसिएशनचे शिष्टमंडळ गुरुवारी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांची भेट घेणार आहे. जिल्ह्यात होणारी संभाव्य परिस्थिती सांगून केटरर्स व्यावसायिकांना सिलिंडर उपलब्ध करुन देण्याची मागणी केली जाणार आहे.
गॅस सिलिंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर अनेकांची विचारणा झाली आहे. लग्नसोहळा रद्द करा, असे अद्याप कोणी सांगितलेले नाही. मात्र, येत्या काही दिवसांत परिस्थिती गंभीर होऊ शकते, असे वाटते. -विवेक शिंदे, अध्यक्ष कोल्हापूर केटरिंग वेलफेअर असोसिएशन
Web Summary : Kolhapur weddings face disruption due to gas cylinder shortages. Caterers struggle, potentially raising costs or postponing events. The Kolhapur Caterers Association seeks intervention from supply officers to resolve the crisis, impacting numerous upcoming ceremonies.
Web Summary : कोल्हापुर में गैस सिलेंडर की कमी से विवाह समारोह बाधित। कैटरर्स परेशान, लागत बढ़ने या कार्यक्रम स्थगित होने की आशंका। कोल्हापुर कैटरर्स एसोसिएशन ने आपूर्ति अधिकारियों से हस्तक्षेप की मांग की, जिससे आगामी समारोह प्रभावित।