शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

यंदा मिरवणूक नाही, पूजादेखील मर्यादित व्यक्तीच करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:31 IST

कोल्हापूर : कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शासनाच्या ...

कोल्हापूर : कोविडमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्व नागरिकांनी पालन करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलवकडे यांनी बुधवारी केले. यंदा मिरवणूक निघणार नाही, सार्वजिनक मंडळातील गणेशपूजादेखील मर्यादित लोक करतील, असेही त्यांनी सांगितले.

बुधवारी प्रशासक बलकवडे यांनी संबंधीत खातेप्रमुखांची बैठक आयोजित केली होती. यामध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गणेशोत्सव साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरीता चार फूट व घरगुती गणपतीकरिता दोन फूट उंचीची मूर्ती बसविण्यात यावी. सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रतिष्ठापनेकरीता दहा बाय दहा फुट आकाराचे मंडप उभारल्यास त्यांना परवानगी देण्यात येईल. गणेश उत्सव मंडळांनी शक्यतो त्यांचे मंडळाचे इमारत, तालीममध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. गणेश मूर्तीची दैनंदिन पूजा मर्यादित म्हणजेच ४ ते ५ आणि शक्यतो दोन्ही लस घेतलेल्या व्यक्तींच्या उपस्थितीत करावी. मंडपामध्ये पाचपेक्षा अधिक लोक असणार नाहीत तसेच मंडपासमोर दर्शनासाठी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

आगमणावेळी तसेच विसर्जन मिरवणूक, देखावे, विसर्जन मार्गावर कोणालाही स्वागत मंडप उभारण्यास मनाई करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.