‘सह्याद्री’तील वाघ, बिबट्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:27 IST2021-09-24T04:27:13+5:302021-09-24T04:27:13+5:30

कोल्हापूर : इको-टुरिझमच्या माध्यमातून मानव व प्राणी यांच्यातील संघर्ष कमी करणे. यासह सह्याद्रीतील वाघ, बिबट्यांच्या संवर्धनासाठी ‘सह्याद्री वाइल्ड लाइफ ...

Tigers in ‘Sahyadri’, striving for conservation of leopards | ‘सह्याद्री’तील वाघ, बिबट्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील

‘सह्याद्री’तील वाघ, बिबट्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील

कोल्हापूर : इको-टुरिझमच्या माध्यमातून मानव व प्राणी यांच्यातील संघर्ष कमी करणे. यासह सह्याद्रीतील वाघ, बिबट्यांच्या संवर्धनासाठी ‘सह्याद्री वाइल्ड लाइफ फाउंडेशन’ कार्यरत राहणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आशिष पिलानी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

पिलानी म्हणाले, संस्थेची स्थापना २३ एप्रिल २०२१ ला करण्यात आली. संस्थेचा मुख्य हेतू वन्य प्राण्यांचे संरक्षण, संवर्धन करणे आहे. विशेषत: सह्याद्रीतील हरवलेले वन्यजीव अधिवास पूर्ववत करणे, वाढत्या हवामानाचे संकट व नैसर्गिक संवर्धनावर वाढता दबाव ही एक शोकांतिका आहे. त्याकरिता संतुलित आणि स्थिर, शाश्वत पुनर्जीवन देण्यासाठी संस्थेचा कार्यरत राहणार आहे. दुर्मीळ होत चाललेल्या वाघ, बिबट्यांच्या संवर्धनासाठीही संस्था प्रयत्नशील आहे. यासाठी वन विभागाला मदत केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून चंदगड वनक्षेेत्रापासून संस्थेने कामाला सुरुवात केली आहे. यात वन कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. परिसरात राहणाऱ्या नागरिकांमधील नकारात्मकता ही दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिल्लारी, गोवा, कर्नाटकचा काही भाग जंगलाला जोडले आहेत. त्यात बिबट्या व वाघांची संख्या भरपूर आहे. त्यांच्या संवर्धनासाठी संस्था कार्यरत राहणार आहे. यावेळी उपाध्यक्ष निखिल जोशी, रौनक पाटील, मिलिंद घाटगे आदी उपस्थित होते.

Web Title: Tigers in ‘Sahyadri’, striving for conservation of leopards