Kolhapur Rain: मेघगर्जनेसह पावसाने कोल्हापूरला झोडपले -video
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 16:57 IST2026-04-01T16:56:17+5:302026-04-01T16:57:33+5:30
उष्म्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना मात्र काहीसा सुखद गारवा मिळाला.

Kolhapur Rain: मेघगर्जनेसह पावसाने कोल्हापूरला झोडपले -video
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात आज, बुधवारी दुपारी ३ नंतर मेघगर्जनेसह पावसाने चांगलेच झोडपून काढले. तास-दीड तास झालेल्या या जोरदार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सर्वत्र पाणीच पाणी झाले तर सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांना कसरत करत गाडी चालवावी लागली. उष्म्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना मात्र काहीसा सुखद गारवा मिळाला.
गेल्या काही दिवसापासून जिह्यात वळीव पावसाने हजेरी लावली आहे. सकाळी उन्हाचा तडाखा अन् दुपारनंतर वातावरणात अचानकच बदल होवून जोरदार पाऊस कोसळत आहे. शहरात आज, सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. मात्र कमालीचा उष्मा जाणवत होता. दुपारी ३ नंतर शहरात मेघगर्जनेसह जोरदार पावसाने सुरुवात केली. सुमारे तास-दीड तास पावसाने झोडपून काढल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते.