पाण्याच्या बॅरेलमध्ये पडून तीन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:53 IST2021-09-02T04:53:50+5:302021-09-02T04:53:50+5:30

कागल : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील एका सिमेंट पाईप कंपनीत वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय कुटुंबातील तीनवर्षीय बालिका पाण्याने भरलेल्या बॅरेलमध्ये ...

Three-year-old girl dies after falling into water barrel | पाण्याच्या बॅरेलमध्ये पडून तीन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू

पाण्याच्या बॅरेलमध्ये पडून तीन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू

कागल : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील एका सिमेंट पाईप कंपनीत वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय कुटुंबातील तीनवर्षीय बालिका पाण्याने भरलेल्या बॅरेलमध्ये पडल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास लक्ष्मी सिमेंट पाईप कंपनीत घडली. शिवानी राजू सहानी असे या बालिकेचे नाव आहे.

कागल पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बिहार राज्यातील मुज्जफरपूर जिल्ह्यातील राजू सहानी हे पत्नी सीतादेवीसमवेत कारखाना आवारात कामगारासाठी बांधलेल्या खोलीत राहतात. बुधवारी सकाळी सीतादेवी या धुणे धुत असताना जवळच मुलगी शिवानी खेळत होती. खेळता खेळता ती पाण्याने भरलेल्या लहान बॅरेलजवळ गेली. बॅरेलमध्ये तोल जाऊन पडल्याने तिचा बुडून मृत्यू झाला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे करीत आहेत.

Web Title: Three-year-old girl dies after falling into water barrel