तिघा ऊसतोड मुकादमांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST2021-01-20T04:25:11+5:302021-01-20T04:25:11+5:30

जयसिंगपूर : ऊसतोड मजूर पुरवितो असे सांगून फसवणूक करणाऱ्या व वर्षभरापासून फरार असणाऱ्या तिघा ऊसतोड मुकादमांना अटक केल्यानंतर न्यायालयाने ...

Three Ustod Mukadams in custody | तिघा ऊसतोड मुकादमांना कोठडी

तिघा ऊसतोड मुकादमांना कोठडी

जयसिंगपूर : ऊसतोड मजूर पुरवितो असे सांगून फसवणूक करणाऱ्या व वर्षभरापासून फरार असणाऱ्या तिघा ऊसतोड मुकादमांना अटक केल्यानंतर न्यायालयाने कोठडी सुनावली. सुखदेव रावण बरडे (रा. डोंगरपिंपळा, जि. बीड), भास्कर रोहिदास राठोड (रा. बेल्लोरे, जि. परभणी) व राजेंद्र महादेव गुगवाडे (रा. शेड्याळ, जि. सांगली) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. शिरोळ पोलीस ठाण्याच्या पथकाने तिघांनाही गजाआड केले. संशयित आरोपी बरडे हा अकरा महिन्यापासून पोलिसांना चकवा देत होता. त्याच्यावर फेब्रुवारी २०२० मध्ये ८ लाख ७५ हजारांची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद होता. ऊसतोड मजूर पुरवितो असे सांगून राठोड व गुगवाडे यांनी १२ लाख व ८ लाख ८५ हजार अशी रक्कम घेऊन फसवणूक केली. संशयितांना न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सुळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सानप, हनुमंत माळी, ताहीर मुल्ला यांच्या पथकाने ही कारवाई केली.

फोटो - १९०१२०२१-जेएवाय-०१-संशयित सुखदेव बरडे, भास्कर राठोड, राजेंद्र गुगवाडे.

Web Title: Three Ustod Mukadams in custody