कोल्हापूरचे तीन विद्यार्थी अजूनही युक्रेन-रशियामध्येच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 13:04 IST2022-03-02T13:04:13+5:302022-03-02T13:04:41+5:30

केंद्र शासनाच्या जिल्हा प्रशासनाला रोज नवनवीन सूचना

Three students from Kolhapur are still in Ukraine Russia | कोल्हापूरचे तीन विद्यार्थी अजूनही युक्रेन-रशियामध्येच

कोल्हापूरचे तीन विद्यार्थी अजूनही युक्रेन-रशियामध्येच

कोल्हापूर : रशिया व युक्रेनमधील युद्धामुळे कोल्हापूरचे तीन विद्यार्थी अजूनही युक्रेन व रशियामध्ये अडकले आहेत. सध्या युक्रेनमधील परिस्थिती अधिकच बिघडल्याने विद्यार्थ्यांना परिस्थिती बघून बाहेर पडा, किंवा आहे तिथेच सुरक्षित थांबा, असे सांगितले आहे. केंद्र शासनाच्या रोज नवनवीन सूचना जिल्हा प्रशासनाला येत आहेत.

युक्रेनमध्ये कोल्हापुरातील चार विद्यार्थी होते. त्यातील दोन विद्यार्थिनी सोमवारी कोल्हापुरात सुखरूप पोहोचल्या. आणखी एक विद्यार्थिनी व एक विद्यार्थी युक्रेनमध्ये आहे. त्यांचा पालकांशी संपर्क झाला असून, ते सुरक्षित आहेत; पण त्यांना भारतात परत आणण्याची व्यवस्था अजून झालेली नाही.

एक विद्यार्थी रशियामध्ये असून, तेथे कोणताही धोका नसल्याने तो कोल्हापुरात येणार नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्याशी त्यांचा संपर्क झाला आहे.

Web Title: Three students from Kolhapur are still in Ukraine Russia