वडगावात कोरोनाचे तीन नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:24 IST2021-04-06T04:24:09+5:302021-04-06T04:24:09+5:30

पेठवडगाव: आज सोमवारी कोरोनाचे ३ नवीन रुग्ण सापडले. यातील दिगे काॅलनीतील घरात संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

Three new corona patients in Wadgaon | वडगावात कोरोनाचे तीन नवे रुग्ण

वडगावात कोरोनाचे तीन नवे रुग्ण

पेठवडगाव:

आज सोमवारी कोरोनाचे ३ नवीन रुग्ण सापडले. यातील दिगे काॅलनीतील

घरात संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर नऊ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे वडगावातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ११ झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात २० रुग्ण मिळून आले आहेत.

आज प्रभाग दोनमध्ये नवीन वसाहत येथे एक व्यक्ती कोरोना पाॅझिटिव्ह आला. तर प्रभाग तीनमध्ये काल एका युवकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता, तर त्यांच्या संपर्कातील वडील, बहिणीचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. विना मास्क, सोशल डिस्टन्स कारवाई करण्यात पालिकेचे कर्मचारी उदासीन आहेत; मात्र मोजक्या पालिका कर्मचाऱ्यांना मदतीला घेत कारवाईचा धडाका लावला आहे. आज तब्बल ७० हून अधिक विना मास्क वावरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

Web Title: Three new corona patients in Wadgaon