शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

सैन्यदलात नोकरीचे आमिष, तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 11:10 AM

सैन्यदलात शिपाई भरतीचे आमिष दाखवून भरती प्रक्रियेदरम्यान बनावट प्रश्नपत्रिका व एनसीसीचे प्रमाणपत्र देऊन तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी तिघांना सोमवारी अटक केली.

ठळक मुद्देसैन्यदलात नोकरीचे आमिष, तिघांना अटकबनावट एनसीसीचे प्रमाणपत्र सादर करणाऱ्यास तीन दिवसांची कोठडी

कोल्हापूर : सैन्यदलात शिपाई भरतीचे आमिष दाखवून भरती प्रक्रियेदरम्यान बनावट प्रश्नपत्रिका व एनसीसीचे प्रमाणपत्र देऊन तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी तिघांना सोमवारी अटक केली.

संशयित देवानंद केरबा पाटील (वय २३, रा. मुदाळ, ता. भुदरगड), अकिब सिकंदर हवालदार (२१, रा. मलकापूर, ता. शाहूवाडी), दिलावर मोहम्मद हवालदार (५५, रा. टेकोली, ता. शाहूवाडी) अशी त्यांची नावे आहेत. देवानंद पाटील याला न्यायालयात हजर केले असता २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. 

या रॅकेटचा म्होरक्या मुख्य सूत्रधार अफझल कासम देवळेकर ऊर्फ सरकार (रा. कडवे, ता. शाहूवाडी), अरविंद लोंढे (रा. कासारवाडी, ता. हातकणंगले) हे दोघे पसार असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

या रॅकेटने भारतीय सैन्य दलामध्ये शिपाईपदावर नोकरी लावतो, आमचा सैन्य दलामध्ये वशिला आहे, असे सांगून इच्छुक उमेदवारांकडून शैक्षणिक कागदपत्रे घेतली आहेत. त्यांनी एनसीसीचे प्रमाणपत्र, सैन्यदलाची प्रश्नपत्रिका यासह अन्य कागदपत्रे बोगस तयार करून त्या उमेदवारांना दिल्या आहेत. त्यांच्याकडून तीन ते पाच लाख रुपये उकळले आहेत.

सुरुवातीला ५० हजार रुपये घेऊन त्यानंतर बोगस प्रक्रिया करून उर्वरित पैसे उकळल्याचे तपासात पुढे येत आहे. त्यांनी ही प्रमाणपत्रे कोठे बनविली, त्यांच्या बैठका कोठे होत होत्या, त्यांच्या टोळीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, यादृष्टीने तपास सुरू आहे.संशयितांच्या मोबाईल कॉल डिटेल्स्वरून मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. या टोळीने अनेक सुशिक्षित तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लुटल्याचे तपासात पुढे येत आहे. मुख्य सूत्रधार अफझल देवळेकर याला अटक झाल्यानंतर संपूर्ण रॅकेट पुढे येणार आहे. त्याचा आम्ही शोध घेत आहोत, अशी माहिती राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी दिली.राज्यात खळबळया रॅकेटकडून कोल्हापूर, कऱ्हाड , सांगली, सातारा, पुणे, मुंबई येथील बेरोजगार तरुणांची फसवणूक करण्यात आली आहे. रॅकेटच्या विरोधात कोल्हापुरात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच राज्यात खळबळ उडाली आहे. अनेक फसवणूक झालेल्या तरुणांनी कोल्हापूर पोलिसांशी फोनवरून संपर्क साधल्याचे समजते.तक्रारी देण्याचे आवाहनसैन्य दलासह अन्य शासकीय विभागात नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपये उकळणारा संशयित मुख्य सूत्रधार अफझल देवळेकर या रॅकेटच्या विरोधात ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.देशद्रोहीच्या गुन्ह्याची मागणीटेंबलाईवाडी येथील ‘आर्मी’ प्रशासनाच्या गोपनीय यंत्रणेच्या रडारवर हे रॅकेट होते. प्रशासनात भरती प्रक्रियेदरम्यान सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करताना काही प्रमाणपत्रे बोगस असल्याचे निदर्शनास आले आहे. काही तरुणांनी प्रशासनाकडे आपले मोबाईल व्हॉटस्अ‍ॅपवर आलेल्या प्रश्नपत्रिकेची चौकशी केल्यानंतर ती बोगस असल्याचे आढळून आले. गोपनीय यंत्रणेने या प्रकरणाचा अहवाल आर्मीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला आहे. संशयितांवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असल्याचे समजते. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर