निधीअभावी अडले पोलिसांचे तीन गृहप्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:10 IST2021-02-05T07:10:12+5:302021-02-05T07:10:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील १३३९ पोलीस अंमलदारांना सुसज्ज व अद्ययावत घरे देण्याची घोषणा पाच वर्षांपूर्वी झाली. चार ...

Three housing projects of Adle police due to lack of funds | निधीअभावी अडले पोलिसांचे तीन गृहप्रकल्प

निधीअभावी अडले पोलिसांचे तीन गृहप्रकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यातील १३३९ पोलीस अंमलदारांना सुसज्ज व अद्ययावत घरे देण्याची घोषणा पाच वर्षांपूर्वी झाली. चार गृहप्रकल्पांना मंजुरी मिळाली, निविदाही निघाली; पण त्यांपैकी तीन गृहप्रकल्प हे निधीअभावी रखडले. बुधवार पेठेतील एक गृहप्रकल्प पूर्णत्वास येत आहे. निधीच मिळाला नसल्याने तिन्ही प्रकल्प पूर्ण होणार की अडगळीच्या घरात राहावे लागणार,अशी अवस्था अंमलदारांची झाली.

जिल्ह्यातील आजच्या पोलीस वसाहती ह्या किमान शंभर वर्षांपूर्वीच्या आहेत. वसाहतीतीतील घर म्हणजे अवघे ३८० स्वेअर फुटांची अंधारकोठडी होय. आठ फुटांची उंची, गळके छप्पर आणि गिलावा निघालेल्या भिंती असे विदारक चित्र होय. अशा परिस्थितीतही पोलीस कर्तव्य बजावतात, हे दिव्यच म्हणावे लागेल.

पोलिसांची दयनीय अवस्था पाहून एप्रिल २०१६ मध्ये तत्कालीन गृह विभागाचे अप्पर सचिव के. पी. बक्षी यांनी कोल्हापूरला भेट देऊन वसाहतींची पाहणी केली. त्यांनी तातडीने जिल्ह्यातील अंमलदारांच्या चार ठिकाणच्या गृहप्रकल्पांना हिरवा कंदील दर्शवला.

गृहप्रकल्पाची घोषणा झाली, निविदाही मंजूर झाली; पण निधीअभावी घोडे आडले. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून किमान जुना बुधवार पेठेतील गृहप्रकल्पाला चालना मिळाली. सुमारे १९ हजार स्वेअर फूट जागेत चारपैकी तीन इमारतींचा १६८ ‘टू बीएच के’ घरांचा अद्ययावत प्रकल्प पूर्णत्वात आहे. या प्रकल्पासाठी २८ कोटी रुपये निधी मिळाला; पण इतर तीन गृहप्रकल्प फक्त घोषणेतच अडकले.

निविदाही निघाली; पण घरे अद्याप स्वप्नवतच...

चारही गृहप्रकल्पांच्या निविदाही मंजूर झाल्या, संबंधित कामाच्या वर्कऑ र्डरही दिल्या. पण शासनाच्या अर्थखात्याकडून निधी देण्यात कुचराई झाली अन‌् हे चारपैकी तीन गृहप्रकल्प लटकले. त्यामुळे हे गृहप्रकल्प निधीअभावी स्वप्नवत राहणार अशी भीती व्यक् होत आहे.

जुनी पोलीस वसाहती व तेथील घरे

- पोलीस मुख्यालय : ७१८

- लक्ष्मीपुरी : ६०

- भगवा चौक (कसबा बावडा) : ५१

- बुधवार पेठ - ८४

जिल्ह्यातील मंजूर घरे

- मुख्यालय - ६९७

- लक्ष्मीपुरी- २००

- बुधवार पेठ - २०० (पैकी तीन इमारतीत १६८ घरांचे बांधकाम सुरु)

- इचलकरंजी : २४२

- एकूण : १३३९

कोट...

गृह विभागाची बैठक फेब्रुवारी अखेरीस होईल, त्यामध्ये खडलेल्या तीन गृहप्रकल्पावर चर्चा होईल, त्याबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी नुकताच आढावा घेतला, पुढील पाच वर्षाचे नियोजन करुन हे प्रकल्प पूर्ण करण्याबाबत प्रयत्न आहेत. - शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा

फोटो नं. ३१०१२०२१-कोल- पोलीस०१

ओळ : लक्ष्मीपुरीतील जुनी पोलीस वसाहत

फोटो नं. ३१०१२०२१-कोल- पोलीस०२

ओळ : जुना बुधवार पेठेत बांधकाम सुरु असलेल्या पोलिसांचा गृहप्रकल्प

(छााया : आदित्य वेल्हाळ)

Web Title: Three housing projects of Adle police due to lack of funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.