शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चेन स्नॅचिंगच्या तीन घटनांत सात तोळे लंपास

By admin | Updated: May 5, 2015 01:11 IST

शहरात खळबळ : शाहूूपुरीत दोन, तर साळोखेनगरात एक घटना

कोल्हापूर : शहरात सोमवारी सलग तीन चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्याने खळबळ उडाली. शाहूपुरीत दोन, तर साळोखेनगरात झालेल्या एका प्रकारात तब्बल सात तोळे दागिने चोरट्यांनी लंपास केले. साळोखेनगर येथे सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास एका महिलेच्या गळ्यातील पाच तोळे दागिने हिसकावून नेण्याचा प्रकार घडला. शीतल विश्वास पानारी (रा. हणमंतवाडी) असे दागिने गेलेल्या महिलेचे नाव आहे. लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात संशयितांविरोधात जुना राजवाडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. शीतल पानारी या एका घरगुती लग्न समारंभासाठी हणमंतवाडी येथून साळोखेनगर येथील नातेवाइकांच्या घरी आल्या होत्या. सायंकाळी बांगड्या घालण्यासाठी त्या नातेवाईक अनिल बाबूराव साळोखे यांच्यासमवेत पदपथावरून चालत जात होत्या. दरम्यान, लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण, मणीमंगळसूत्र व नेकलेस असे सोन्याचे दागिने हिसडा मारून नेले. अचानक घडलेल्या प्रकाराने शीतल भांबावून गेल्या. अंधाराचा फायदा घेऊन दोघे चोरटे पसार झाले. सोन्याचे गंठण अडीच तोळे, मणीमंगळसूत्र एक तोळा व सोन्याचा नेकलेस दीड तोळा असे पाच तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी हिसकावून नेल्याची तक्रार शीतल पानारी यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री दोन ठिकाणी चेन स्नॅचिंगचा प्रकार घडला. शतपावली करण्यास गेलेल्या वृद्धाची दीड तोळ्याची चेन व मोपेडवरून घरी जाणाऱ्या महिलेची पर्स चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केली. नितीन अनंत रेडिज (वय ७०, रा. रुईकर कॉलनी) हे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास जेवण करून शतपावली करण्यासाठी घराबाहेर फिरत होते. यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघा तरुणांनी त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन हिसडा मारून पोबारा केला तसेच दीपिका दिनकर जावळे (५०, रा. साईनाथ कॉलनी, कसबा बावडा) ह्या मुलीसोबत मोपेडवरून रात्री नऊच्या सुमारास घरी जात होत्या. महासैनिक दरबार हॉलच्यासमोर पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघा तरुणांपैकी पाठीमागे बसलेल्या तरुणाने त्यांच्या हातातील पर्स हिसकावून घेत पलायन केले.