शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते खुदाईत तीन कोटींचा ढपला : शेट

By admin | Updated: November 28, 2014 23:43 IST

खासगी कंपनी व मनपा अधिकाऱ्यांची करामते

कोल्हापूर : शहरात एका खासगी कंपनीकडून सुरू असलेल्या केबलच्या खुदाईसाठीचे हवाई सर्वेक्षण केले आहे. याचा प्रति कि लोमीटर १७ लाख ५० हजार रुपये खर्च आहे. परंतु, सर्वेक्षण चुकल्याने या कामात एकूण २० किलोमीटरचा फरक पडत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कंपनीशी मिलीभगत करून तीन कोटींचा ढपला पाडत महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान केल्याचा आरोप नगरसेवक भूपाल शेटे यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. माहितीच्या अधिकारात मागविलेली कागदपत्रे शेटे यांनी यावेळी सादर केली. शेटे म्हणाले, शहरात पहिल्या टप्प्यात २३ किलोमीटरपर्यंत केबल टाकण्याचे काम सुरू झाले. प्रत्यक्षात हे काम ३३ किलोमीटरचे झाले. ठेकेदाराने हे काम केल्यानंतर रस्ता दुरुस्ती व खुदाईचे पैसे भरल्याची खात्री न करताच पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील ४५ किलोमीटरच्या खुदाईची मंजुरी याच कंपनीला देण्यात आली. आता ४५ किलोमीटरची परवानगी घेऊन कंपनीने ६० कि.मी.पर्यंत खुदाई करून केबल टाकली आहे. रस्ता खुदाई केल्यानंतर यातील फक्त पाच टक्केच रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम कंपनीने केले आहे. त्यामुळे या सर्व खुदाईची व कामाची चौकशी त्रयस्थ संस्थेमार्फत करावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास याबाबत न्यायालयात दाद मागणार आहे. या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी शहर अभियंता व बांधकाम विभागाची आहे. कंपनीने केबलसाठी ३५ लाख रुपयांचा ‘एलबीटी’ भरलेला आहे. नगण्य ‘एलबीटी’ भरून कंपनीने यातून एक कोटीपेक्षा अधिकचा महापालिकेचा महसूल बुडविला आहे. या सर्व प्रकाराबाबत पोलीस तक्रार घेण्यास टाळाटाळ करत आहेत. - नगरसेवक भूपाल शेटे