शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात गावठी पिस्तुले विकायला आणलेल्या तिघांना अटक; सांगली, पुणे जिल्ह्यांतील दोघे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 15:30 IST

जादा पैसे मिळवण्यासाठी पिस्तूल विक्रीचा मार्ग अवलंबला

कोल्हापूर : दसरा चौकात गावठी पिस्तुलांची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना पकडून त्यांना पिस्तुले पुरवणाऱ्या पुरवठादारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी (दि. २६) अटक केली. त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तुले, एक जिवंत काडतूस, दुचाकी आणि तीन मोबाइल असा सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.प्रथमेश भटूपंत गायकवाड (वय २०, रा. येलूर, ता. वाळवा, जि. सांगली, राम मारुती सावंत (१९, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) आणि शुभम शंकर मासुले (२३, रा. इंदिरानगर, यवत, ता. दौंड, जि. पुणे) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. यातील प्रथमेश आणि राम हे दोघे पिस्तुलाची विक्री करण्यासाठी दसरा चौकात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अंमलदार संदीप बेंद्रे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने मंगळवारी (दि. २५) सकाळी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्यांनी पुणे जिल्ह्यातील शुभम मासुळे याच्याकडून विक्रीसाठी पिस्तुले आणल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने यवत येथे जाऊन मासुळे याला अटक केली.मासुळे याच्यावर पुणे जिल्ह्यात मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने आणखी काहीजणांना पिस्तुलांची विक्री केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानुसार त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिन्ही संशयितांवर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या सूचनेनुसार पथकाने ही कारवाई केली.गायकवाड, सावंत एमआयडीसीतील मित्रप्रथमेश गायकवाड आणि राम सावंत हे दोघे शिरोली एमआयडीसी येथे एका कंपनीत काम करत होते. कामाच्या ठिकाणी मैत्री झाल्यानंतर त्यांनी जादा पैसे मिळवण्यासाठी पिस्तूल विक्रीचा मार्ग अवलंबला. मात्र, पहिल्याच प्रयत्नात ते दोघे पोलिसांच्या हाती लागले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगलीPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस