शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: व्हिडिओ कॉलवरून पिस्तूल दाखवत धमकावले; सराईत गुन्हेगाराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 17:42 IST

पाचगाव-गिरगाव रोडवर करवीर पोलिसांची कारवाई

कोल्हापूर : सराईत गुन्हेगाराने व्हिडिओ कॉलवरून एका तरुणाला पिस्तूल दाखवत धमकावल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली होती. त्याची शहानिशा करून पोलिसांनी सराईत गुन्हेगार विशाल बबन जाधव ऊर्फ मांगोरे (वय २९, सध्या रा. प्रगतीनगर, पाचगाव, मूळ रा. माळ गल्ली, कसबा बावडा, कोल्हापूर) याला अटक केली. त्याच्याकडून ७५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल जप्त केले. ही कारवाई मंगळवारी (दि. ३) दुपारी पाचगाव-गिरगाव रोडवर केली.करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल मांगुरे याने गेल्या आठवड्यात एका तरुणाला व्हिडिओ कॉल करून पिस्तूल दाखवत धमकावले होते. त्याची माहिती अंमलदार योगेश लोकरे यांना मिळाली होती. त्याची शहानिशा करून पोलिसांनी मांगुरे याच्यावर पाळत ठेवली. तो मंगळवारी दुपारी पाचगाव ते गिरगाव रोडवरील एका फार्महाऊसजवळ येणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचून त्याला अटक केली.अंगझडतीत त्याच्या कमरेला लावलेले गावठी पिस्तूल मिळाले. पोलिसांनी पिस्तूल जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक नाथा गळवे यांच्यासह अंमलदार योगेश लोकरे, बजरंग लाड, अक्षय पवार, लखन राजगुरू, रफिक आवळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.कमरेला पिस्तूल लावून दहशतअनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेला मांगुरे हा गेल्या काही दिवसांपासून गावठी पिस्तूल कमरेला लावून फिरत होता. सणासुदीच्या दिवसात दहशत माजवण्याचा प्रयत्न त्याच्याकडून सुरू होता. त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली. एका ट्रकचालकाकडून पिस्तूल खरेदी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. संबंधित ट्रकचालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Notorious Criminal Arrested for Brandishing Pistol on Video Call

Web Summary : Kolhapur police arrested Vishal Jadhav for threatening a youth with a pistol on a video call. A country-made pistol worth ₹75,000 was seized. He was planning to spread terror during the festive season by brandishing the weapon.