शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चिमुकल्यांना आजपासून मिळणार कपडे

By admin | Updated: November 30, 2014 23:58 IST

लोकमत इनिशिएटिव्ह

कोल्हापूर : शहरातील विविध झोपडपट्टी वसाहतींमध्ये थंडीत कुडकुडणाऱ्या चिमुकल्यांची व्यथा ‘लोकमत इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून ‘लोकमत’ने मांडली. कपड्यांच्या माध्यमातून त्यांना माणुसकीची ऊब देण्याचे आवाहन केले. त्यानंतर मदतीसाठी कोल्हापूरकर सरसावले. विविध सामाजिक, कामगार, शैक्षणिक संस्था, संघटना आणि नागरिकांनी कपडे संकलन मोहिमेत सहभाग घेतला. त्याद्वारे संकलित झालेल्या कपड्यांचे उद्या, सोमवारपासून ‘अवनि’ संस्थेच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहे. त्याची सुरुवात दुपारी एक वाजता कसबा बावडा (ता. करवीर) येथील राजाराम साखर कारखाना परिसरातील ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना कपडे देऊन केली जाणार आहे.वंचित मुलांसाठी कार्यरत असलेल्या ‘अवनि’ने ‘लोकमत’च्या उपक्रमात सहभागी होण्यासह नागरिकांकडून मिळणारे कपडे एकत्रित संकलित करण्यासाठी पुढाकार घेतला. शिवाय भाऊसिंगजी रोडवरील ‘एकटी’ संस्थेच्या कार्यालयात कपडे संकलनाची मोहीम सुरू केली. गेल्या १९ दिवसांच्या मोहिमेला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. शहरासह जिल्ह्यातील विविध भागांतील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी शाळा, सामाजिक, कामगार, शैक्षणिक संस्थांनी ‘एकटी’च्या कार्यालयात कपडे जमा केले. सुमारे दोन ते अडीच हजार मुलांना देता येतील इतके कपडे संकलित झाले आहेत. या कपड्यांचे ‘अवनि’ने विविध मुलांच्या वयांनुसार वर्गीकरण केले आहे. संकलित झालेल्या कपड्यांच्या वाटपाला उद्या राजाराम साखर कारखाना परिसरातील ऊसतोडणी मजुरांच्या वसाहतीपासून सुरुवात केली जाणार आहे. (प्रतिनिधी)