शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
2
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर गावठी बॉम्बस्फोट प्रकरणी दिवसभर कसून चौकशी

By admin | Updated: August 25, 2014 00:02 IST

एटीएस’चे पथक कोल्हापुरात : धागेदोरे अद्याप हाती नाहीत

कोल्हापूर : शाहू जकात नाक्याजवळ झालेल्या गावठी बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुणे येथील दहशतवादी विरोधी पथक आज, रविवारी कोल्हापुरात दाखल झाले. या पथकाने घटनास्थळाबरोबरच आजू-बाजूच्या परिसराची कसून तपासणी केली. चिकनच्या गाडीचा चालक श्रीधर कोठावळे व मनोज परब या दोघा तरुणांकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. नेमका बॉम्ब कोणी ठेवला, कोणत्या कारणासाठी ठेवला याचे गूढ मात्र, अद्याप एटीएस पथकासह कोल्हापूर पोलिसांना उलगडता आलेले नाही. शाहू जकात नाक्याजवळ शनिवारी चिकनचे खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या हातगाडीत गावठी बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटात गाडीचालक श्रीधर कोठावळे व मनोज परब हे दोघे जखमी झाले. या स्फोटाची माहिती गोकुळ शिरगाव व राजारामपुरी पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी तरुणांकडे कसून चौकशी केली. परंतु त्यांच्या हाती कोणतेच धागेदोरे लागले नाहीत. कोल्हापुरातील बॉम्बशोध पथकाने घटनास्थळी येऊन परिसराची चाचपणी केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस दल दक्ष असताना शाहू जकात नाक्याजवळ बॉम्बस्फोट झाल्याने पोलीस प्रशासनाची झोपच उडाली. गृहखात्यानेही या प्रकरणाची माहिती मागविल्याने पोलीस आज दिवसभर परिसरात तळ ठोकून होते. दरम्यान, आज पहाटे दहशतवादी विरोधी पथकाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक हे टीमसह घटनास्थळी आले. त्यांनी हातगाडीच्या सभोवती सुमारे चार तास तपास केला. त्यानंतर जखमी तरुणांकडे बंद खोलीत चर्चा केली. बॉम्बचा स्फोट कसा झाला, व्यावसायिक पूर्ववैमनस्यातून हा प्रकार झाला आहे का? याची माहिती घेण्यात आली. (प्रतिनिधी)