Kolhapur crime: चोरट्यांनी कुत्र्यांना बिस्किटे खायला घातले, अन् घरफोडी करुन सहा तोळ्यांचे दागिने लंपास केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 12:28 IST2025-03-26T12:28:28+5:302025-03-26T12:28:45+5:30

कोल्हापूर : कदमवाडी येथील विजयनगर हौसिंग सोसायटीत प्राध्यापिकेच्या बंगल्यातील कुत्र्यांना बिस्किटे खायला घालून चोरट्यांनी कुलूप तोडून बेडमधील सहा तोळ्यांचे ...

Thieves stole jewellery worth six tolas by feeding biscuits to dogs in kolhapur | Kolhapur crime: चोरट्यांनी कुत्र्यांना बिस्किटे खायला घातले, अन् घरफोडी करुन सहा तोळ्यांचे दागिने लंपास केले

Kolhapur crime: चोरट्यांनी कुत्र्यांना बिस्किटे खायला घातले, अन् घरफोडी करुन सहा तोळ्यांचे दागिने लंपास केले

कोल्हापूर : कदमवाडी येथील विजयनगर हौसिंग सोसायटीत प्राध्यापिकेच्या बंगल्यातील कुत्र्यांना बिस्किटे खायला घालून चोरट्यांनी कुलूप तोडून बेडमधील सहा तोळ्यांचे दागिने लंपास केले. हा प्रकार शुक्रवारी (दि. २१) सकाळी नऊ ते रात्री अकराच्या दरम्यान घडला. याबाबत जानकी तानाजीराव सुर्वे (वय ४१, सध्या रा. कदमवाडी, मूळ रा. पाडळी, ता. तासगाव, जि. सांगली) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जानकी सुर्वे या कदमवाडीतील नर्सिंग कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत. विजयनगर हौसिंग सोसायटीत राजागंगा बंगल्यात त्या एकट्याच भाड्याने राहतात. त्यांच्याकडे दोन कुत्री आहेत. त्या नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ९ वाजता घर बंद करून कॉलेजवर गेल्या. त्यावेळी त्यांची दोन्ही कुत्री बंगल्याच्या हॉलमध्ये होती.

रात्री अकराच्या सुमारास परत आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप काढलेले दिसले. आत जाऊन पाहिले असता कुत्र्यांसमोर काही बिस्किटे पडली होती. वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये साहित्य विस्कटले होते. बेडचे कुलूप तोडून चोरट्याने सहा तोळे दागिन्यांची चोरी केल्याचे लक्षात येताच त्यांनी शाहूपुरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. 

शाहूपुरी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात यश आले नाही. चोरट्यांनी कुत्र्यांसमोर बिस्किटे टाकून त्यांना खाण्यात व्यस्त ठेवले. त्यानंतर त्यांनी दागिन्यांवर डल्ला मारला असावा, अशी माहिती फिर्यादींनी दिली.

चार लाखांचा ऐवज चोरीस

दोन तोळ्यांचे मंगळसूत्र, एक तोळ्याची सोनसाखळी, दोन तोळ्यांच्या दोन अंगठ्या, अर्ध्या तोळ्याची कर्णफुले आणि अर्धा तोळ्यांचे इतर दागिने असा सुमारे चार लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचा उल्लेख सुर्वे यांनी फिर्यादीत केला आहे.

Web Title: Thieves stole jewellery worth six tolas by feeding biscuits to dogs in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.