कोल्हापुरात शाहूपुरी पोलिस चौकीसमोरच भामट्यांनी वृद्धाचे दागिने लांबविले

By उद्धव गोडसे | Updated: April 29, 2024 13:30 IST2024-04-29T13:28:16+5:302024-04-29T13:30:58+5:30

कोल्हापूर : आचारसंहिता सुरू असताना अंगावर दागिने घालून कशाला फिरताय, असे म्हणत दोन भामट्यांनी हातचालाखीने वृद्धाकडील साडेतीन तोळ्यांचे दागिने ...

thief stole the jewels of an old man In front of the Shahupuri police post in Kolhapur | कोल्हापुरात शाहूपुरी पोलिस चौकीसमोरच भामट्यांनी वृद्धाचे दागिने लांबविले

कोल्हापुरात शाहूपुरी पोलिस चौकीसमोरच भामट्यांनी वृद्धाचे दागिने लांबविले

कोल्हापूर : आचारसंहिता सुरू असताना अंगावर दागिने घालून कशाला फिरताय, असे म्हणत दोन भामट्यांनी हातचालाखीने वृद्धाकडील साडेतीन तोळ्यांचे दागिने लंपास केले. हा प्रकार रविवारी (दि. २८) दुपारी चारच्या सुमारास शाहूपुरी पोलिस चौकीसमोर घडला.

दुचाकीवरून घराकडे निघालेले विजय तातोबा मंडपे (वय ७३, रा. शाहूपुरी दुसरी गल्ली, कोल्हापूर) यांना दोघांनी अडवले. दुचाकी रस्त्याकडेला लावून त्यांना गळ्यातील दोन तोळ्यांची चेन आणि दीड तोळ्यांच्या बोटातील दोन अंगठ्या रुमालात बांधून डिकीत ठेवण्यास सांगितले. 

त्याचवेळी हातचालाखीने त्यांच्या हातात दुसरा रुमाल देऊन दागिन्यांचा रुमाल लांबविला. घरी गेल्यानंतर मंडपे यांना फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आला. याबाबत त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने दोन संशयित भामट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.

Web Title: thief stole the jewels of an old man In front of the Shahupuri police post in Kolhapur