शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे शिवसेना भवनात जाणार; मनसे स्थापनेनंतर पहिल्यांदाच 'असं' घडणार
2
“आता मोदींचा फोन आला तरी माघार नाही, अपक्ष लढणारच”; तिकीट नाकारताच भाजपा नेत्याचा एल्गार
3
नागपुरात भाजपाच्या बंडखोर उमेदवाराला समर्थकांनीच घरात कोंडलं, गावंडे म्हणाले, "पाया पडतो, मला..."
4
“मोहन भागवत हिंदीत बोलतात, मराठीत बोलताना कधी ऐकले आहे का?”; संजय राऊतांची RSSवर टीका
5
भाजपच्या आणखी दोन जागा बिनविरोध; प्रभाग 19 मधून दर्शना भोईर तर प्रभाग 20 मधून अजय बहिरा बिनविरोध
6
धक्कादायक! भारतात महिला कैद्यांच्या संख्येत विक्रमी १६२% वाढ; पुरुष कैद्यांच्या वाढीच्या तुलनेत वेग दुप्पट!
7
काँग्रेसच्या सर्व्हेनेच राहुल गांधींचा दावा खोटा ठरवला! लोकांचा ईव्हीएमवर विश्वास
8
Nashik Municipal Election 2026: एबी फॉर्म घोटाळा नाट्य; अखेर मुख्यमंत्री मैदानात; घोळ घालणाऱ्यांवर कारवाईचे आश्वासन
9
मुलींच्या मेसेजने हैराण झालाय प्रणित मोरे, चाहतीने घातली थेट लग्नाची मागणी, म्हणाला- "तिने मला पत्रिका पाठवली आणि..."
10
बंटी जहागीरदार हत्या: गोळ्या झाडून फरार झालेल्या आरोपींना समृद्धी महामार्गावर अटक, कसे पकडले?
11
'आम्ही तुझ्याबद्दल विचार करतो..', न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचे उमर खालिदला पत्र
12
मी पाकिस्तानी अन् मुस्लिम यामुळे मला...; गंभीर आरोप करत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा...
13
हृदयद्रावक! आईला शेवटचा कॉल, पत्नीला पाठवलं लोकेशन; SBI मॅनेजरने नदीत मारली उडी अन्...
14
पहिल्याच दिवशी १००% नं वधारला 'हा' शेअर, गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट; IPO ला मिळालेला जोरदार प्रतिसाद
15
Mumbai Crime: डिलिव्हरी बॉय बनून घरात शिरला, चाकूचा धाक दाखवून विद्यार्थिनीला लुटलं अन्... अंधेरीतील थरार!
16
Nashik Municipal Election 2026: भाजप शहराध्यक्षांना नाराजीची गाजरे! सुनील केदार यांना घेराव, पक्ष कार्यालयात कोंडण्याचा प्रयत्न
17
'पागल हो गया है क्या?', अक्षय खन्ना कास्टिंग डायरेक्टरवर चिडलाच; नक्की काय घडलेलं?
18
"देवाने आनंद दिला, पुन्हा हिरावून घेतला"; १० वर्षांनी नवसाने झालेल्या ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू
19
ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
20
25 वर्षांचा विक्रम मोडला! एका कारने बदलले कंपनीचे नशीब; इतक्या गाड्यांची विक्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘कोल्हापूर लोकसभे’साठी ‘सरप्राईज चेहरा’ असेल - सतेज पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 12:06 IST

जिल्हा नियोजनाच्या निधीबाबत न्यायालयात जाणार

कोल्हापूर : महाविकास आघाडीमध्ये लोकसभा जागावाटप अंतिम टप्यात असून जानेवारीच्या अखेरीस उमेदवार निश्चित केला जाईल. कोल्हापूर लोकसभेसाठी ‘सरप्राईज चेहरा’ असेल. सध्या जे पाच इच्छुक आहेत, त्यांपैकी एक असू शकतो, तिन्ही पक्षांपैकी जागा कुणाला मिळणार ? यापेक्षा भाजपविरोधात लढणे हीच आमची भूमिका असेल, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. जिल्हा नियोजनच्या निधीबाबत प्रसंगी न्यायालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आमदार पाटील म्हणाले, पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना राज्यातील कोणत्या लोकसभेच्या जागा हव्यात, याची यादी पाठवलेली आहे. आगामी काही काळात याची स्पष्टता येईल. महाविकास आघाडीचे सर्वाधिक खासदार निवडून येण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न असणार आहेत.जिल्हा नियोजनच्या निधीवाटपात तुम्ही सत्ताधारी म्हणून दहा पैसे जादा घ्या; पण विराेधकांना बाजूलाच करणार असाल तर ते कोणत्या घटनेत बसते? मंत्री म्हणून सगळ्यांना समान वागणूक देण्याची शपथ घेता; पण निधीवाटपात असा दुजाभाव का? कोल्हापूरची जिल्हा नियोजन समिती नाही, तर सत्तारूढ नियोजन समिती आहे. जिल्हा नियोजनच्या बैठकीत याबाबत पत्र देणार आहे. त्यात दुरुस्ती झाली नाही तर न्यायालयात दाद मागणार आहे.

राजू शेट्टी आमच्यासोबतच राहणार‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांच्याशी आपली दोन वेळा प्राथमिक चर्चा झालेली आहे. हातकणंगलेसह राज्यातील इतर जागांबाबत मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू झालेली आहे. आमदार अपात्रतेचा निकाल झाल्यानंतर स्पष्ट येईल. तरीही जानेवारीअखेर उमेदवार निश्चित होतील. काही झाले तरी शेट्टी आमच्यासोबतच राहतील, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

शिंदे गटाच्या खासदारांना हवे ‘कमळ’मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या सात खासदारांनी त्यांना ‘कमळ’ चिन्हावरच लढायचे आहे, असे लेखी दिल्याची माहिती माझ्याकडे असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.जनता मतदानाची वाट बघतेयकेंद्र सरकारने काढलेल्या यात्रेला जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. जनतेला खोटे चालत नाही, ती मतदानाची वाट बघत आहे. महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीलाच मतदान करील, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील