शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी पालिका सभेत प्रचंड गोंधळ

By admin | Updated: July 10, 2015 01:09 IST

माईकची आदळाआपट : खुर्च्यांची फेकाफेक

इचलकरंजी : येथील नगरपालिकेची विशेष सभा सुरू असताना मोर्चाचे निवेदन घेण्यासाठी सभागृहाबाहेर जाताना नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव यांना अध्यक्षांच्या खुर्चीवर बसविले. उपनगराध्यक्ष रणजित जाधव सभागृहात असताना ‘शविआ’च्या जाधव यांना अध्यक्षांच्या खुर्चीवर बसविल्याने कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्षेप घेत नगराध्यक्षांच्या टेबलाकडे धाव घेतली. यावेळी ‘शविआ’चे नगरसेवकसुद्धा तेथे आल्याने शाब्दिक चकमक उडून प्रचंड गोंधळ उडाला. माईकची आदळाआपट, आरोप-प्रत्यारोप, खुर्च्या फेकणे, अशा वातावरणामुळे सभागृहात तणाव निर्माण झाला.नगराध्यक्षा बिरंजे यांनी विविध २६ विषयांवर नगरपालिकेची विशेष सभा बोलावली होती. साडेअकरा वाजता सुरू झालेल्या सभेमध्ये सुरुवातीलाच कॉँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होऊन दीड महिना लोटला, तरी कर्मचारी बदलीच्या ठिकाणी हजर झाले नसल्याचा विषय उपस्थित केला. त्यावर बोलताना मुख्याधिकारी सुनील पवार यांनी हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांना नोटिसा दिल्या आहेत. संवर्ग अधिकारी मूळ पदाच्या ठिकाणी हजर झाल्यानंतर बदल्यांच्या ठिकाणी उपस्थित झाले नसलेल्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.पालिकेचा आयजीएम दवाखाना पब्लिक / प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) तत्त्वावर चालविण्यासाठी देण्याच्या प्रस्तावाला कॉँग्रेसने जोरदार (पान २ वर)अविश्वासाचा अण्णांचा आदेशसभागृहामध्ये कॉँग्रेसकडून होणारा कडवा विरोध पाहता ‘शविआ’चे पक्षप्रतोद जाधव यांनी ‘नगराध्यक्षांवरील अविश्वासाचा आदेश अण्णांनी दिल्यामुळे सभागृहामध्ये नगराध्यक्षांना धारेवर धरत आहात’, असे म्हणताच संतप्त झालेल्या कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी जाधव यांना चुकीचे बोलू नका, असे सुनावले.तांब्या-वाटीही भिरकावलीउपनगराध्यक्षांना डावलून अजित जाधव अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी टेबलावर येऊन माईकची आदळआपट केली, तर एक माईक फेकून दिला. याशिवाय पाणी पिण्यासाठी ठेवलेली तांब्या-वाटीसुद्धा भिरकावली.राष्ट्रवादीतील फूट उघडआयजीएम पीपीपी तत्त्वावर देण्याच्या विषयावर झालेल्या मतदानावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष नगरसेवक विठ्ठल चोपडे, नगरसेविका शुभांगी माळी व माधुरी चव्हाण यांनी ‘शविआ’च्या बाजूने मतदान केले, तर उर्वरित जांभळे गटाचे नगरसेवक कॉँग्रेसबरोबरच राहिले.