शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
2
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
3
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
4
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
5
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
6
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
7
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
8
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
9
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
10
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
11
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
12
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
13
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
14
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
15
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
16
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
17
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
18
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
19
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
20
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
Daily Top 2Weekly Top 5

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत सर्वच पक्षांत उमेदवारीचा घोळात घोळ; शिव-शाहू आघाडीत स्वाभिमानी परतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:48 IST

अनेक उमेदवार गॅसवर; मतदार बुचकळ्यात

अतुल आंबीइचलकरंजी : महापालिका निवडणुकीसाठी महायुती झाली, उद्धवसेना वगळता शिव-शाहू आघाडीचे पण जमले. परंतु, दोन्हीकडे उमेदवारी यादी जाहीर करण्याचा घोळात घोळ सुरूच आहे. आज, मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असूनही अनेक ठिकाणचे उमेदवार बदलाबदलीचा खेळ रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. गत चार दिवसांत घडलेल्या घडामोडी आणि वारंवार उमेदवारांची नावे बदलली जात असल्याने त्या प्रभागातील मतदारही बुचकळ्यात पडले आहेत.भाजपकडे सर्वाधिक मागणी झाल्याने नाराजीनाट्य व बंडखोरीचा प्रकार पुढे येऊ लागला. यादी जाहीर केल्यास मोठ्या प्रमाणात गळती लागेल, या भीतीने पक्षश्रेष्ठींनी गोपनीय पद्धतीने कारभार सुरू केला आहे. ज्याठिकाणी उमेदवार निश्चित झाले आहेत, त्यांना पक्षाचा अधिकृत बी फॉर्म देऊन उमेदवारी दाखल करण्यास सांगितले. तर, ज्याठिकाणी फेरबदलाचा खेळ सुरू आहे, त्यांना तात्पुरते पक्ष आणि अपक्ष असे दोन अर्ज भरण्यास सांगण्यात आले आहे. आयत्या वेळी घडणाऱ्या घडामोडींमुळे असे फेरबदल होत आहेत.

वाचा : अर्ज भरण्यासाठी आलेल्या कार्यकर्ते-पोलिसांत वादावादी, आज शेवटचा दिवशी झुंबड उडणारया फेरबदलामुळे अनेक उमेदवारांना या प्रभागातून त्या प्रभागात अचानक अर्ज भरायला सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्या प्रभागातील मतदारही बुचकळ्यात पडले आहेत. दोन दिवसांपूर्वी नाव वेगळे होते, आता वेगळे आहे, असाही प्रकार सुरू आहे. ज्याठिकाणी एकमताने उमेदवारी निश्चित झाली आहे, त्याठिकाणी सर्व काही सुरळीत सुरू असून, त्यांचा प्रचारही सुरू झाला आहे.

स्वाभिमानी पुन्हा आघाडीतशिव-शाहू आघाडीत स्वाभिमानी परतली आहे. काही दिवसांपूर्वी ते वंचित बहुजन आघाडीसोबत परिवर्तन आघाडीत सहभागी झाले होते. त्यांनी सोमवारी निर्णय बदलला. त्याचबरोबर आणखीन काही उमेदवार आघाडीकडे येण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्यासोबत रात्री उशिरापर्यंत खलबत्ते सुरू होती. येणाऱ्या व्यक्तींची नावे बाहेर पडल्यास त्यांना रोखण्यासाठी समजूत काढण्याचा प्रकार घडतो. त्यामुळे आघाडीकडून गोपनीय पद्धतीने सूत्रे हाताळली जात आहेत. आज, मंगळवारी अर्ज भरल्यानंतरच उमेदवारांची नावे आणि काही नावांचा गौप्यस्फोट होणार आहे.

वाचा : कोल्हापुरात महायुतीचे जागा वाटप जाहीर; भाजप ३६, शिंदेसेना ३०, राष्ट्रवादीला १५ जागा

मतदारांना गृहीत धरल्याच्या भावनाइचलकरंजीत भाजप, शिंदेसेना यांचे निश्चित झाले. त्यापाठोपाठ राष्टवादी अजित पवार गटाने दोन जागांवर तडजोड केली असली, तरी अन्य जागांवर ते मैत्रिपूर्णचा डाव मांडण्याच्या तयारीत आहेत. त्याचबरोबर शिव-शाहू आघाडी त्यांच्याकडे येणाऱ्यांना जागा करून उमेदवारी देण्याचे बेरजेचे गणित ते घालत आहेत, तर आघाडीतून बाहेर पडलेल्या उद्धवसेनेने स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचे नियोजन लावले आहे.

या सर्व राजकीय उलथापालथीच्या घडामोडीत उमेदवार इकडून तिकडे उड्या मारताना दिसत आहेत. त्यामुळे मतदारांना गृहीत धरले आहे का, अशी तीव्र भावना काही नागरिकांनी व्यक्त केली. त्याचबरोबर समाजमाध्यमांवरही असे मेसेज व्हायरल होत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji Election 2026: Candidate Confusion Amidst All Parties; Swabhimani Returns

Web Summary : Ichalkaranji's municipal election sees candidate chaos as parties scramble for nominations. Shiv-Shahu alliance welcomes back Swabhimani, adding to the pre-election drama and voter uncertainty.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Mahayutiमहायुतीcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार