शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
3
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
4
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
5
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
6
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
7
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
8
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
9
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
10
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
11
French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
12
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
13
पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य
14
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
15
बॉलिवूड, साऊथ अन् मराठी कलाकार! रणबीरच्या 'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट, आदिनाथ कोठारेही दिसणार
16
Tarot Card: दुःखावर सुखाची फुंकर घालणारा आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
KL राहुल 'नॅशनल ड्युटी स्टार्ट विथ ब्युटीफुल सेंच्युरी'! १८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची दिली 'गॅरेंटी'
18
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
19
मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा, त्वचेचा रंग
20
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती

Kolhapur: ‘डिजिटल अरेस्ट’चे रॅकेट देशाबाहेरही असल्याची शक्यता, पुण्यातून आणखी दोघे ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 15:36 IST

२७ लाख रुपये मिळाले परत

कोल्हापूर : येथील सेवानिवृत्त प्राध्यापिकेला डिजिटल अरेस्टची भीती घालून ३ कोटी ५७ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी कोल्हापूरपोलिसांनी पुण्यातून आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. यापूर्वी ताब्यात घेतलेल्या दोघांसोबतच या दोघांचीही कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता देशाबाहेर आणि देशाबाहेरूनही हे रॅकेट चालवले जात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.मनी लाँड्रिंगच्या खटल्याप्रकरणी डिजिटल अरेस्टची भीती घालून मीना मुरलीधर डोंगरे (वय ७५, रा. सम्राटनगर, कोल्हापूर) यांना एका टोळीने ३ कोटी ५७ लाख रुपयांचा गंडा घातला होता. काही दिवसांपूर्वी हा प्रकार उघडकीस आला. केवळ हे एकच प्रकरण नव्हे तर या सायबर भामट्यांनी २७ मे रोजी एकाच दिवसात ११ बँक खात्यांमधून अनेकांना १३ कोटींचा गंडा घातल्याचे समोर आले होते. यातील १० खात्यांवर २७ मे रोजी तब्बल १३ कोटी रुपये वर्ग झाले. हे सर्व पैसे इतर खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले.

ही फसवणुकीची रक्कम चेन्नई, जयपूर, मुंबई, पुणे, पंजाब, आसाम, ओडिशा यासह विविध राज्यांतील १२ बँकांच्या वेगवेगळ्या ३९ खात्यांमध्ये वर्ग केल्याचे पोलिस तपासात आढळले. यानंतर आणखीन ७० बँक खात्यांची माहिती समोर आली असून पोलिसांनी आतापर्यंत १३० हून अधिक बँक खात्यांची तपासणी केली आहे. याच चौकशीतून ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे समोर आली आहेत. यातून या चौघांना ताब्यात घेतले आहे.

समोरासमोर चौकशीया प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी सुरुवातीला पिंपरी येथून एकास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या चौकशीतून आणखी एकाचे नाव समजले. या दोघांनाही ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असताना आणखी दोघांची नावे समोर आली आहेत. आता या चौघांची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार आहे.

२७ लाख रुपये मिळाले परतपोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत २७ लाख रुपये परत मिळवले आहेत. ही रक्कम काही दिवसांतच फिर्यादी मीना मुरलीधर डोंगरे यांना परत करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcyber crimeसायबर क्राइमCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस