Kolhapur News: भरधाव दुचाकीवरुन पडून तरुणाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 18:39 IST2023-03-14T18:30:25+5:302023-03-14T18:39:31+5:30
डोक्याला जबर मार बसून अतिरक्तस्राव झाल्याने जागेवरच मृत्यू झाला

Kolhapur News: भरधाव दुचाकीवरुन पडून तरुणाचा जागीच मृत्यू
शिवाजी सावंत
गारगोटी: दुचाकीवरील ताबा सुटून पडल्याने दगडावर डोके आपटून रक्तस्त्राव झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. विशाल विनायक कांबळे (वय २३, रा पांगीरे, ता. भुदरगड) असे मृत तरुणाचे नाव आहे. पांगिरे ते गारगोटी मार्गावर काल, सोमवारी (दि.१३) मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची नोंद भुदरगड पोलिसात झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विशाल हा काल सोमवारी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास दुचाकीवरुन (एम एच.१५ बी एम ८२५१) गारगोटी कडून येत होता. पांगिरे ते गारगोटी मार्गावर शिवाजी अंतु घोटणे यांचे शेताजवळ आल्यावर त्याचा दुचाकीवरील ताबा सुटून तो रस्त्यालगत असलेल्या चरीत पडला. यावेळी त्याचे दगडावर डोके आपटले.
यावेळी डोक्याला जबर मार बसून अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडिल, आजा आजी, भाऊ असा परिवार आहे. त्याने डोक्यावर हेल्मेट घातले असते तर तो कदाचित बचावला असता. अपघाताबाबतची फिर्याद त्याचे वडील विनायक कांबळे यांनी भुदरगड पोलिसात दिली आहे.