शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

चार कोटी खर्चून कोल्हापुरातील हॉकी मैदानाचा देखावा, खेळाडूंना अ‍ॅस्ट्रो टर्फवर सराव करण्यात अडचणी

By भारत चव्हाण | Updated: July 18, 2025 15:58 IST

राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याची स्थानिक खेळाडूंची इच्छा अपूर्ण 

भारत चव्हाणकोल्हापूर : जिल्ह्याने राज्य व राष्ट्रीय पातळीवर गुणवत्ता सिद्ध करणारे असंख्य हॉकीपट्टू दिले, त्याची दखल घेत केंद्र सरकारने ‘खेलो इंडिया’ अंतर्गत कोल्हापूरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी स्टेडियम मंजूर केले. त्याकरिता साडेसात कोटींचा निधीही मंजूर केला, परंतु मंजूर केलेल्या निधीतील काही निधी मिळाला नसल्याने कामे अपूर्ण राहिली आहेत. त्यामुळे हॉकी स्टेडियमवर सराव, तसेच राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याची स्थानिक खेळाडूंची इच्छा अपूर्ण राहिली आहे.जिल्ह्याला कुस्ती, फुटबॉल, जलतरण, नेमबाजी या खेळांबरोबरच हॉकीचीदेखील मोठी परंपरा लाभली आहे. शहरात तसेच ग्रामीण भागात हॉकीचे चांगलेच आकर्षण आहे. या आकर्षणातून शालेयस्तरावरच खेळाडू तयार होत आहेत. शालेय, जिल्हा तसेच विभागीय स्तरावरून राज्य, तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. आजही फुटबॉल खालोखाल हॉकीच्या खेळाडूंची संख्या सर्वाधिक आहे. परंतु, या सर्व खेळाडूंना साध्या मैदानावर खेळायची सवय आहे, ॲस्ट्रो टर्फवर खेळण्याचा अनुभव नाही.या सर्व गोष्टींचा विचार करून तसेच जागतिक स्तरावर भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी कोल्हापूर परिसरातील खेळाडूंना मिळावी या हेतूने हॉकी प्रशिक्षक विजय साळोखे सरदार यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ॲस्ट्रोटर्फचे एक अत्याधुनिक स्टेडियम उभारण्याचा निर्णय कोल्हापूर महापालिका प्रशासनाने घेतला. त्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव तयार करून तो केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’कडे पाठविला. हॉकी स्टेडियमसाठी महापालिकेने सहा एकरची जागा राखीव ठेवल्यामुळे या प्रस्तावाला लागलीच मान्यता देण्यात आली.माजी खासदार संभाजीराजे यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारच्या पातळीवर अनेक प्रक्रिया पार पाडण्यात मदत झाली. केंद्र सरकारने ‘खेलो इंडिया’मधून साडेसात कोटींचा निधी दिला. मंजूर रकमेपैकी चार कोटी रुपयांचा निधी महापालिका प्रशासनाकडे वर्ग झाला. त्यामुळे कामालाही लागलीच सुरुवात झाली. परंतु पुढचा निधी उपलब्ध न झाल्यामुळे उर्वरित कामे रखडली आहेत. त्यामुळे ॲस्ट्रो टर्फ टाकूनदेखील खेळाडूंना सराव करण्यात अडचणी येत आहेत.

  • हॉकी स्टेडियमसाठी मंजूर निधी - ७.५० कोटी
  • आतापर्यंत प्राप्त निधी केवळ - ४ कोटी
  • महापालिका येणे निधी - १.५० कोटी
  • केंद्र सरकारकडून येणे निधी - १.५० कोटी

दोन एकरांत वसतिगृहाची आवश्यकताहॉकी मैदानासाठी सहा एकर जागा आरक्षित आहे. त्यापैकी चार एकरांत सुसज्ज मैदान आणि दोन एकरांत खेळाडूंसाठी वसतिगृह अशी संकल्पना आहे. परंतु वसतिगृहाचा प्रस्तावदेखील तयार झालेला नाही.

मैदान अपूर्ण असल्यामुळे आम्ही जिल्हा, विभागीय, तसेच राज्य स्तरीय स्पर्धांची मागणी करूनदेखील त्या घेता येत नाहीत. सीसीटीव्ही, रंगरंगोटी, गोलपोस्ट, पंच रेस्टरूम अशी काही किरकोळ कामे निधीअभावी मागे राहिली आहेत. - विजय साळोखे, प्रशिक्षक