‘गोकुळ’चे कामकाज कौतुकास्पद, तुकाराम मुंढे यांनी काढले गौरवोद्गार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 11:58 IST2023-10-25T11:57:45+5:302023-10-25T11:58:12+5:30

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. सहकारी दुग्धव्यवसायामध्ये ‘ गोकुळ’चे नाव आदर्शवत असून दुग्ध व्यवसायातील एक ...

The work of Gokul is commendable, Tukaram Mundhe praised it | ‘गोकुळ’चे कामकाज कौतुकास्पद, तुकाराम मुंढे यांनी काढले गौरवोद्गार 

‘गोकुळ’चे कामकाज कौतुकास्पद, तुकाराम मुंढे यांनी काढले गौरवोद्गार 

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. सहकारी दुग्धव्यवसायामध्ये ‘गोकुळ’चे नाव आदर्शवत असून दुग्ध व्यवसायातील एक नावाजलेला ब्रँड आहे. शेतकऱ्यांसाठी संघाने राबविलेल्या योजना कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी काढले. 

गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे व मुंबई शाखेचे व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी सचिव मुंढे यांची मुंबईत भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्ष डोंगळे यांनी ‘गोकुळ’ने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजनांची माहिती दिली. संघाचा सर्वाधिक दूध दर आणि पशुसंवर्धन विभागामार्फत पुरवीत असलेल्या सुविधा इतर संघापेक्षा अधिक दर्जेदार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 

Web Title: The work of Gokul is commendable, Tukaram Mundhe praised it