kolhapur news: दोनवडेतील युवतीची आत्महत्या, नेमकं कारण अद्याप अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 18:03 IST2023-01-18T18:03:28+5:302023-01-18T18:03:58+5:30

समृद्धीने अचानक असा टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात हळहळ

The suicide of a young girl in Donawade Kolhapur, The exact cause is still unclear | kolhapur news: दोनवडेतील युवतीची आत्महत्या, नेमकं कारण अद्याप अस्पष्ट

kolhapur news: दोनवडेतील युवतीची आत्महत्या, नेमकं कारण अद्याप अस्पष्ट

प्रकाश पाटील

कोपार्डे : दोनवडे (ता. करवीर) येथील युवतीने काल, मंगळवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. समृद्धी कृष्णात कदम (वय १८) असे तिचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे. समृद्धीने अचानक असा टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेली माहिती अशी की, समृद्धी कदम ही १२ वी सायन्समध्ये शिकत होती. ती अत्यंत हुशार व आईवडिलांना एकुलती एक होती. अभ्यासासाठी नेहमी ती पहाटे उठत असे. नित्यनेमाने ती आजही पहाटे उठली पण आई-वडील झोपेत असल्याचे पाहून तिने जनावरांच्या शेडमध्ये जाऊन गळफास घेतला. 

वडिल कृष्णात यांना काहीतरी आवाज आल्यानंतर जाग आली. यावेळी त्यांना समृद्धीने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तत्काळ तिला बेशुद्ध अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

Web Title: The suicide of a young girl in Donawade Kolhapur, The exact cause is still unclear