सुनील चौगलेआमजाई व्हरवडे : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी लावलेली ताकद, माजी आमदार के.पी. पाटील यांनी प्रतिष्ठेची केलेली निवडणूक आणि भाजपने अस्तित्वासाठी दिलेली निकराची झुंज या सगळ्या शक्तींना त्याच ताकदीने रोखत आमदार सतेज पाटील व जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक ए.वाय. पाटील यांनी एकसंधपणे राधानगरी तालुक्यात मिळवलेले यश, आगामी राजकारणाला कलाटणी देणारे ठरणार हे निश्चित आहे. कसबा तारळे मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील असलेल्या भाग्यश्री डोंगळे यांनी काँग्रेसकडून निकराची झुंज दिली, पण अरुण डोंगळे यांची मेहनत व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी लावलेल्या जोडण्या यशस्वी झाल्या. ‘राशिवडे’ मध्ये सागर धुंदरे राष्ट्रवादीकडून इच्छुक होते, पण उमेदवारी न मिळाल्याने ‘हात’ घेऊन नेटानी लढले.
वाचा: आम्हाला कुणाच्याही पाठिंब्याची गरज नाही, सतेज पाटलांच्या गुगलीवर मंत्री आबिटकर यांचा टोला येथे ‘भोगावती’चे संचालक अविनाश पाटील यांची धुंदरे यांना मिळालेली साथ, विनय पाटील यांचा अश्व रोखू शकला. ‘सरवडे’ हा पारंपरिक वैरवार विसरून माेरे व ‘ए.वाय.’ गट एकत्र आले आणि बालेकिल्ला असलेली जागा ‘ए.वाय.’ यांनी माेरे यांच्या घरात देऊन विजयाचा पाया रचला. कसबा वाळवे हा पालकमंत्री आबीटकर यांनी बालेकिल्ला शाबूत ठेवला. त्याशिवाय पंचायत समितीच्या दहा पैकी सहा जागा जिंकत बऱ्याच वर्षानंतर पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकवला.
..अन् मालोजीराजेंनी तळ ठोकला ‘राधानगरी’ मतदारसंघात अभिजित तायशेटे यांच्या विजयात ‘भोगावती’चे माजी संचालक ए.डी. पाटील-गुडाळकर यांची साथ महत्त्वाची ठरली त्याचबरोबर शेवटचे तीन दिवस माजी आमदार मालोजीराजे व मधुरिमाराजे यांनी तळ ठोकल्याने यश मिळाले.‘ए.वाय.’ यांनी हिशेब चुकते केलेमागील निवडणुकीत विनय पाटील यांना ‘राशिवडे’तून तर सविता राजेंद्र भाटले यांना ‘ए.वाय.’ यांनी ‘राधानगरी’तून ताकदीने निवडून आणले. पण, त्यांच्या अडचणीच्या काळात दोघांनी साथ सोडल्याने ही सल ‘ए.वाय.’ यांच्या मनात होती. या निवडणुकीच्या निमित्ताने दोघांनाही पराभूत करत त्यांनी हिशेब चुकते केल्याची चर्चा तालुक्यात आहे.मुश्रीफ यांच्या जोडण्या अन् ‘अमृता’चा विजय!अमृता डोंगळे यांच्या उमेदवारीसाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांचे समर्थक सागर धुंदरे व धीरज डोंगळे काँग्रेससोबत गेले. पण, मंत्री हसन मुश्रीफ हे ‘अमृता’च्या उमेदवारीवर ठाम राहिले. नुसती उमेदवारी दिली नाहीतर त्यांनी शेवटच्या टप्प्यात लावलेल्या जोडण्याच ‘अमृता’ ना गुलाल लावून गेल्या.