शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रमुख मागण्या मान्य; गेल्या दीड महिन्यापासून सुरु असलेला अंगणवाडी सेविकांचा संप अखेर मागे 

By विश्वास पाटील | Updated: January 25, 2024 17:23 IST

कोल्हापूर : अंगणवाडी कर्मचारी कृति समितीच्या नेत्यांची  महिला व बालविकास विभागाचे सचिव  अनुपकुमार यादव आणि महिला बाल विकास आयुक्त ...

कोल्हापूर : अंगणवाडी कर्मचारी कृति समितीच्या नेत्यांची  महिला व बालविकास विभागाचे सचिव  अनुपकुमार यादव आणि महिला बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल व अन्य आधिकाऱ्यांसोबत विस्तृत मीटिंग झाली. त्यामध्ये प्रमुख मागण्या मान्य झाल्याने ४ डिसेंबर पासून सुरु असलेला संप मागे घेण्यात आला. वेतनश्रेणी करण्याची मुख्य मागणी मात्र मान्य झाली नाही. संपच्या काळातील मानधनबाबतही निर्णय झाला नाही..त्यामुळे संप मागे घेतल्यावर कर्मचाऱ्यामध्ये नाराजी व्यक्त झाली. बैठकीत एम. ए. पाटील, शुभा शमीम,दिलीप उटाणे,कमल परुळेकर,भगवान देशमुख,जीवन सुरुडे, जयश्री पाटील आदींनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली.मान्य झालेल्या मागण्या अशा 

  • शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या साठी पेंशन योजनेचा अंतिम  प्रस्ताव तातडीने  तयार करण्याचे मान्य केले असून लवकरात लवकर प्रस्ताव  मंत्रीमंडळात  मंजुरीसाठी पाठवला जाईल असे सांगितले. तसेच कृति समितीच्या वतीने पेंशन योजने बाबत ठोस  सुधारणांचा लेखी प्रस्ताव देण्यात आला.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या  निर्णयाप्रमाणे ग्रॅच्युईटी देण्याचे मान्य केलें.
  • मोबाइल  तात्काळ  देणार.
  • मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका पदाचे आदेश त्वरित देणार. 
  • संपकाळात कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे मान्य केले. सर्व कारवाई आदेश मागे घेणार असे मान्य केले
  • संप काळ करोना काळातील राहिलेल्या  दिवाळी व उन्हाळी  सुट्टी मध्ये समायोजित करण्याविषयी सकारात्मक विचार करणार.
  • १०वी पास मदतनिसांना सेविका पदी थेट नियुक्ती देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. 

सर्व चर्चा सचिव आणि आयुक्त यांच्याशी झाली. कृती समितीला ही चर्चा  आशादायक वाटली. त्याचप्रमाणे महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी  दिनांक ५/१२/२०२३ रोजी झालेल्या मीटिंग मधे  दिलेल्या  आश्वासनाप्रमाणे आशा सेविकांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत  आल्या नंतर त्याचें अवलोकन करुन अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा विषय मंत्री मंडळात मांडण्यात येईल.शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे तसेच ग्रॅच्युइटी व पेन्शनचा महत्वाचा निर्णय होत असल्याने अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने संप मागे घेतला. बैठकीला एम. ए. पाटील, ॲड. निशा शिवूरकर, शुभा शमीम , दिलीप उटाणे, दत्ता देशमुख, सुवर्णा तळेकर, आप्पा पाटील, आरमायटी इराणी, ॲड. माधुरी क्षीरसागर हे कृति समितीचे सदस्य उपस्थित होते.अंगणवाडी  कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या एकजूट आणि  संघर्षामुळे आपल्या महत्वाच्या मागण्या मान्य होत आहेत.  मानधनवाढीबाबत लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा करुया अशी प्रतिक्रिया संघटनेच्यावतीने व्यक्त झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStrikeसंप