शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Municipal Election 2026: मतदानातील गैरप्रकार रोखणार, हुल्लडबाजी केल्यास ठोकणार; कोल्हापूरसह इचलकरंजीतही सशस्त्र तुकड्या तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 18:43 IST

कोल्हापुरात १८४ बूथ उपद्रवी, पोलिस प्रशासन अलर्ट 

कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने बंदोबस्ताचे तगडे नियोजन केले आहे. दोन्ही शहरांत दीड हजार पोलिस, १२१० होमगार्ड यासह शीघ्रकृती दलाच्या सशस्त्र तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत. उपद्रवी केंद्रांची निश्चिती केली असून, त्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. तसेच मतदान शांततेत होण्यासाठी सराईतांवर नजर असल्याची माहिती पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली.निवडणुकीसाठी पोलिस खात्याची तयारीमहापालिका निवडणुकांसाठी पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांपासून तयारीला सुरुवात केली होती. दोन आणि त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या सराईतांना नोटिसा देणे, गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळ्यांना हद्दपार करणे, गुन्हेगारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणे, उपद्रवी मतदान केंद्रांची निश्चिती करण्यासह मतदान आणि मतमोजणीसाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.१०० अधिकारी, १४०० पोलिस कर्मचारीकोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन्ही शहरातील बंदोबस्तासाठी सुमारे १०० पोलिस अधिकारी आणि १४०० अंमलदार तैनात केले जाणार आहेत. याशिवाय १२१० होमगार्ड, एसआरपीएफ आणि सीआरपीएफच्या प्रत्येकी दोन सशस्त्र तुकड्या बंदोबस्तासाठी सज्ज आहेत.कोल्हापुरात १८४ बूथ उपद्रवीशहरात ४४ ठिकाणी १८४ मतदान केंद्रे उपद्रवी आहेत. यात सदर बाजार, विक्रमनगर, राजेंद्रनगर, लक्षतीर्थ वसाहत यासह पेठांमधील काही भागाचा समावेश आहे. चुरशीच्या लढतींमुळे संघर्षाची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्ताचे विशेष नियोजन केले आहे. या केंद्रांवर पोलिस आणि होमगार्डसह शीघ्रकृती दलाच्या सशस्त्र तुकड्या तैनात केल्या जाणार आहेत.

२०६ सराईतांना पाठविले जिल्ह्याबाहेरनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यातील २०६ सराईत गुन्हेगारांना हद्दपार केले. यात कोल्हापुरातील १२८, तर इचलकरंजीतील ७८ सराईतांचा समावेश आहे. याशिवाय सुमारे अडीचशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत.

सहा हजार शस्त्रे पोलिसांत जमाजिल्ह्यात सुमारे साडेसात हजार शस्त्रे आहेत. सुरक्षा रक्षक आणि खेळाडूंचा अपवाद वगळता साडेसहा हजार शस्त्रे पोलिस ठाण्यांमध्ये जमा झाली आहेत. जिल्हा परिषद निवडणुका होईपर्यंत ही शस्त्रे पोलिस ठाण्यांमध्येच राहणार आहेत.

शहरातील प्रतिबंधात्मक कारवाया

  • शाहूपुरी : ५१
  • राजारामपुरी : ३७
  • लक्ष्मीपुरी : ३०
  • जुन राजवाडा : ३०

असा आहे बंदोबस्तकोल्हापूर

  • अपर पोलिस उपअधीक्षक : ०१
  • पोलिस उपअधीक्षक : ०६
  • पोलिस निरीक्षक : ११
  • सहायक/उपनिरीक्षक : ४२
  • श्रेणी उपनिरीक्षक : १८
  • पुरुष अंमलदार : ६२४
  • महिला अंमलदार : ९३
  • होमगार्ड : ७९०
  • एसआरपीएफ : दोन तुकड्या
  • सीआरपीएफ : दोन तुकड्या

इचलकरंजी

  • अपर पोलिस उपअधीक्षक : ०१
  • पोलिस उपअधीक्षक : ०३
  • पोलिस निरीक्षक : ०७
  • सहायक/उपनिरीक्षक : २२
  • श्रेणी उपनिरीक्षक : ०८
  • पुरुष अंमलदार : २६८
  • महिला अंमलदार : ३०
  • होमगार्ड : ४२०
  • एसआरपीएफ : एक तुकडी
  • सीआरपीएफ : एक तुकडी
English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Elections 2026: Police to Prevent Rigging, Deploy Forces

Web Summary : Ahead of Kolhapur's municipal elections, police are deploying 1,500 officers, home guards, and rapid action forces to prevent disruptions. 206 criminals were expelled and 6,500 weapons were seized to ensure peaceful voting.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६PoliceपोलिसVotingमतदान