तीन डिग्रीने रोज वाढतोय कोल्हापूरचा पारा, किमान-कमाल तापमान किती.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 12:46 IST2025-02-21T12:45:51+5:302025-02-21T12:46:09+5:30

कोल्हापूर : राज्यात कमाल आणि किमान अशा दोन्हीही तापमानाची सरासरीच्या खाली होणारी पाऱ्याची घसरण बऱ्याच ठिकाणी थांबली आहे. त्यामुळे ...

The mercury in Kolhapur is increasing by three degrees every day | तीन डिग्रीने रोज वाढतोय कोल्हापूरचा पारा, किमान-कमाल तापमान किती.. वाचा सविस्तर

तीन डिग्रीने रोज वाढतोय कोल्हापूरचा पारा, किमान-कमाल तापमान किती.. वाचा सविस्तर

कोल्हापूर : राज्यात कमाल आणि किमान अशा दोन्हीही तापमानाची सरासरीच्या खाली होणारी पाऱ्याची घसरण बऱ्याच ठिकाणी थांबली आहे. त्यामुळे तापमानात होणारी वाढ दिवसेंदिवस वाढल्याचे जाणवत आहे. आज, शुक्रवारी दुपारी ३५ डिग्री अंश सेल्सिअस तापमान होते.

कोल्हापूर आणि जिल्ह्यातही बुधवारी (दि. १९ फेब्रुवारी) नोंदीनुसार दुपारी तीनच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा जवळपास तीन डिग्रीने वाढून सध्या ३० ते ३३ डिग्री अंश सेल्सिअस ग्रेड दरम्यानचे तापमान नोंदविले जात आहे. गेल्या आठवड्यापासून पारा किमान २२ अंशांपासून कमाल ३३ अंशांपर्यंत वाढलेला आहे. बुधवारी (दि. १९ फेब्रुवारी) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ झाली आहे. 

सध्या तेथे २३ ते २६ अंश डिग्री सेल्सिअस ग्रेड दरम्यानचे किमान तापमान नोंदविले आहे. यामुळे या ठिकाणी उष्णतेच्या काहिलीत वाढ होऊन पहाटेचा गारवाही कमी होणार आहे. अर्थात गुरुवारी (दि. २० फेब्रुवारी) पहाटे सहा वाजण्याच्या नोंदीनुसार किमान तापमान १९ अंश डिग्री सेल्सिअस, तर कमाल तापमान ३६ अंश डिग्री सेल्सिअस इतके नोंदविले गेले.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात चमत्कारिकपणे हवेचा दाबात आणि त्यामुळेच जर वारा-वहन प्रणालीत जर अजूनही एकाकी काही बदल झाला तरच थंडीपूरक अशा किमान तापमानाचा पारा खालावून थंडीची अपेक्षा करता येईल. - माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ.

असे होते तापमान (किमान-कमाल)
- दि. १५ : २४-३३
- दि. १६ : २४-३६
- दि. १७ : २२-३४
- दि. १८ : २९-३१
- दि. १९ : २३-३१
- दि. २० : १९-३६

Web Title: The mercury in Kolhapur is increasing by three degrees every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.