कोल्हापुरात सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या पिस्तुलातून हवेत गोळीबार, मोलकरणीच्या मुलाचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 11:37 IST2025-02-04T11:36:10+5:302025-02-04T11:37:03+5:30

युट्यूबवर आणि सिनेमात पाहून शिकला

The maid's son fired the retired police officer's pistol in the air in kolhapur | कोल्हापुरात सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या पिस्तुलातून हवेत गोळीबार, मोलकरणीच्या मुलाचा प्रताप

संग्रहित छाया

गोकुळ शिरगाव : उजळाईवाडी (ता. करवीर) येथील पसरिचानगरमध्ये एका सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या घरात मोलकरणीच्या अल्पवयीन मुलाने पिस्तूल चोरून हवेत आणि घराच्या भिंतीवर गोळ्या झाडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत अधिक माहिती अशी, पसरिचानगरमध्ये सेवानिवृत्त पोलिस अधिकारी महावीर भाऊ सकळे हे अनेक वर्षांपासून राहतात. सकळे यांनी ५१,४०० रुपये किमतीची मेड इन जर्मनी ३२ बोअर आर्मिनिअस जिवंत राउंड लोड असलेली रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवली होती. कपाटाच्या ड्रॉवरला लॉक न करता ड्रॉवर उघड्या स्थितीत होते. मोलकरणीच्या अल्पवयीन मुलाने पिस्तूल चोरून शुक्रवारी भर दुपारी घराच्या भिंतीवर दोन बार काढले. अवतीभवती लाऊड स्पीकर व गोंगाट असल्याने हा आवाज नागरिकांच्या लक्षात आला नाही. त्यानंतर त्याने आपल्या मित्राला घेऊन माळावर जाऊन हवेत बार उडवले. 

या घटनेची फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गांधीनगर येथे मोलकरणीच्या घरी जाऊन चौकशी केली असता बंदूक चोरल्याचे सांगितले. तो अल्पवयीन मुलगा आणि त्याचा तेरा वर्षांच्या मित्राने मणेरमळा या ठिकाणी मोकळ्या माळावर जाऊन हवेत व आंब्याच्या झाडावर बार उडवले. त्यानंतर त्या मुलाने बंदूक एका बोळात टाकली. त्या दोघांनी एकूण ३७ राउंड उडवले. त्या मुलाने बंदुकीसोबत ड्रोनदेखील चोरला होता. 

आईला घरकामाला मदत म्हणून कधी कधी तो जात होता. आपल्या मुलाने पिस्तूल चोरल्याचे मोलकरणीला माहीत नव्हते. साहेबांची खोली साफ करण्याच्या उद्देशाने त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन ड्रॉवर उघडा दिसल्याचा पाहून त्याने बंदूक खिशात घातली. गोकुळ शिरगाव पोलिसांनी अवघ्या तीन तासांत पिस्तूल, पुंगळ्या, ड्रोन हस्तगत केले. बंदूक चालवायला कशी शिकलास, असे विचारल्यावर चित्रपटामध्ये बघून शिकलो असल्याचे त्याने सांगितले.

दिवसभर गल्लीत फायरिंग

अवघ्या १३ वर्षांचा मुलगा हातात रिव्हॉल्व्हर घेऊन गल्लीत दिवसभर फटाके उडविल्यासारखा गोळ्या झाडत होता. त्याने ३४ पेक्षा जास्त गोळ्या झाडल्या. एखाद्याला गोळी लागली असती तर अनर्थ घडला असता. भरदिवसा घडलेला हा प्रकार कोणालाच कसा समजला नाही ? याबाबत पोलिसही अचंबित झाले.

युट्यूबवर पाहून शिकला

रिव्हॉल्व्हरमधील गोळ्या संपल्यानंतर त्याचे चेंबर उघडून त्याने पुन्हा गोळ्या भरल्या. चोरलेल्या सगळ्या गोळ्या हवेत आणि भिंतीवर उडवून त्याने संपविल्या. लहान वयात याचे ज्ञान त्याला कसे आले, याची चौकशी पोलिसांनी केली. युट्यूबवर आणि सिनेमात पाहून शिकल्याचे त्याने सांगितले.

सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक महावीर भाऊ सकळे यांच्या निष्काळजीपणामुळे एखाद्याचा जीव गेला असता. सुदैवाने दुर्घटना टळली. मात्र, सकळे यांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवणार आहे. - सुजितकुमार क्षीरसागर, पोेलिस उपअधीक्षक

Web Title: The maid's son fired the retired police officer's pistol in the air in kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.