शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: दारूची तस्करी, एक्साइजच्या पथकाने फिल्मी स्टाइलने पाठलाग केला; कारचा टायर फुटल्याने टोळी सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 17:53 IST

पोलिस होण्याची संधी हुकली; तस्कर बनला

कोल्हापूर : सोलापूरची भाजी गोव्यात नेऊन विकल्यानंतर येताना ११ लाखांची गोवा बनावटीची दारू घेऊन येणाऱ्या तस्करांच्या टोळीला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याकोल्हापूर विभागीय भरारी पथकाने जेरबंद केले. ही कारवाई शनिवारी (दि. ७) मध्यरात्री राधानगरी मार्गावर वाशी आणि हळदी गावच्या हद्दीत सापळा रचून केली. कारवाईची चाहूल लागताच पळून जाणाऱ्या कारचा टायर फुटल्याने सराईत तस्कर पथकाच्या हाती लागले. पथकाने चौघांना अटक करून त्यांची १५ लाखांची दोन वाहने जप्त केली.ऋषिकेश बिभीषण गायकवाड (वय २६, रा. वाखरी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर), स्वप्निल उर्फ मुन्ना भीमराव वसेकर (२६), संकेत संतोष सोनटक्के (२१, दोघे रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) आणि सूरज संजय लोंढे (२४, रा. देगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी अटकेतील चौघांची नावे आहेत. त्यांच्यावर दारू तस्करीचा गुन्हा दाखल केला असून, तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी झाली.भरारी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, राधानगरी मार्गावरून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारी दोन वाहने कोल्हापूरच्या दिशेने येणार असल्याची टिप अधिकाऱ्यांना मिळाली होता. त्यानुसार पथकाने वाशी आणि हळदी येथे सापळा रचला होता. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास वाशी गावच्या हद्दीत संशयित पिकअप वाहन अडवून झडती घेताना त्यात भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी वापरले जाणारे रिकामे कॅरेट आढळले. त्यामागे लपवलेले दारूचे १५२ बॉक्स पथकाच्या हाती लागले.वाहनचालक ऋषिकेश गायकवाड याला अटक करून पथकाने दारू आणि वाहन असा १७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. भाजी विक्रीच्या आडून दारूची तस्करी करीत असल्याची कबुली गायकवाड याने दिली. निरीक्षक के. एम. पवार, दुय्यम निरीक्षक वाय. एम. फटांगरे यांच्यासह सुरेश भंडारे, सुहास शिरतोडे, राजेंद्र कोळी, मारुती पोवार, योगेश शेलार, आदींच्या पथकाने कारवाई केली.फिल्मी स्टाइलने पाठलाग करून पकडलेहळदी येथील पथकाने संशयित कार अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कारवाईची चाहूल लागताच कार वळवून तस्कर राधानगरीच्या दिशेने निघाले. पथकाने त्यांचा पाच ते सहा किलोमीटर पाठलाग केला. कारचा टायर फुटल्याने सराईत तस्कर स्वप्निल उर्फ मुन्ना वसेकर आणि त्याचे दोन साथीदार पथकाच्या हाती लागले. त्याच्या कारमध्ये दारूचे ३५ बॉक्स मिळाले. कार आणि दारू असा ८ लाख ६० हजारांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.

सोलापुरात विक्रीअटकेतील चौघे २० ते २६ वयोगटातील आहेत. यातील मुन्ना हा टोळीचा म्होरक्या असून, तो सराईत तस्कर आहे. गोवा बनावटीची दारू सोलापूर जिल्ह्यातील छुपे विक्रेते, काही वाईन शॉप आणि महामार्गांशेजारी असलेल्या हॉटेल्सना विकली जाते. यातून तस्करांनी लाखोंची कमाई केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.पोलिस होण्याची संधी हुकली; तस्कर बनलाअटकेतील ऋषिकेश गायकवाड हा पोलिस भरतीची तयारी करीत होता. तीन वेळा अगदी थोडक्या गुणांनी त्याची पोलिस होण्याची संधी हुकली. त्यानंतर कमी वेळेत जादा पैसे मिळवण्याच्या उद्देशाने तो दारू तस्करीच्या रॅकेटमध्ये सहभागी झाल्याचे अधिका-यांन सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरExcise Departmentउत्पादन शुल्क विभागCrime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर