Kolhapur: मुलीला कॉलेजला सोडतो म्हणून दुचाकीवरुन नेले, अन् लैंगिक शोषण केले; एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 17:21 IST2023-08-12T16:32:13+5:302023-08-12T17:21:55+5:30
धमकीही दिली. पण धाडसाने मुलीने घडल्या प्रकाराबाबत आईला सांगितले

Kolhapur: मुलीला कॉलेजला सोडतो म्हणून दुचाकीवरुन नेले, अन् लैंगिक शोषण केले; एकास अटक
इचलकरंजी : ओळखीतील एका अल्पवयीन मुलीला कॉलेजला सोडतो म्हणून लॉजवर नेऊन जबरदस्तीने तिचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी विनायक विलास चव्हाण (वय ४०, रा. कोरोची, ता. हातकणंगले) या संशयितास शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संशयित विनायक याने गुरूवारी (दि.१०) सकाळी ओळखीतील एका मुलीला कॉलेजला सोडतो म्हणून मोटारसायकलवरून नेले. मात्र, तिला कॉलेजला न नेता कोल्हापूर रोडवरील नंदनवन लॉजवर नेले. तेथे जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास तुझे काही खरे नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर धाडसाने मुलीने घडल्या प्रकाराबाबत आईला सांगितल्याने आईने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.