शिवाजी पुलावरुन तरुणाने घेतली पंचगंगा नदीत उडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 13:36 IST2022-01-24T13:27:10+5:302022-01-24T13:36:56+5:30

सकाळच्या सुमारासच घडलेल्या याप्रकाराने एकच खळबळ उडाली.

The girl jumped into the river Panchganga from Shivaji bridge in kolhapur | शिवाजी पुलावरुन तरुणाने घेतली पंचगंगा नदीत उडी 

शिवाजी पुलावरुन तरुणाने घेतली पंचगंगा नदीत उडी 

कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील शिवाजी पुलावरुन एका तरुणाने पंचगंगा नदीमध्ये उडी घेतली. याप्रकाराने एकच खळबळ उडाली. काही नागरिकांना हे निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांनी माहिती दिली. यांची माहिती मिळताच महापालिका अग्निशामक दल व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरु केली. 

नेहमीप्रमाणे शिवाजी पुलावरुन वाहतुकीची मोठी वर्दळ सुरु होती. दरम्यान एका तरुणाने पुलावरुन चालत येत थेट पुलावरुन नदीमध्ये उडी घेतली. काही नागरिकांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ घटनेची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस व महापालिका अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
जवानांनी बोटीच्या सहाय्याने तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, अद्याप संबंधित युवतीचा शोध लागला नाही. या तरुणाचा शोध लागल्यानंतर सर्व माहिती समोर येणार आहे. 

Web Title: The girl jumped into the river Panchganga from Shivaji bridge in kolhapur