पोर्ले तर्फ ठाणे (कोल्हापूर): एका खाजगी बंगल्यात रखवालदार म्हणून काम करत असलेल्या पतीने अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात सिंमेटचा चिरा घालून निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी (दि.४) सायंकाळी साडेचारच्या सुमारास पन्हाळगडावर घडली. कांचन रमेश धडेल (वय ५२) असे मृत पत्नीचे नाव आहे. रमेश बाबुराव धडेल (५५ वर्षे रा.मुळ गाव केर्ले, ता. करवीर, सध्या रा.पन्हाळा) असे आरोपीचे नाव आहे.
खुनानंतर रक्ताने माखलेल्या शर्टसहित बंगल्यात बसलेल्या आरोपीला पन्हाळा पोलिसांनी घटनास्थळी येऊन ताब्यात घेत अटक केली. या घटनेची पन्हाळा पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. खुनाच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमेश धडेल गेल्या तीस वर्षापासून आपल्या कुटुंबासह पन्हाळ्यात राहत आहे. खाजगी बंगल्यावर रखवालदार म्हणून काम करतात. गेल्या चार वर्षापासुन रमेश धडेल किशोर चंदवाणी यांच्या बंगल्यावर रखवालीसह देखभालीचे करत आहेत. बंगल्याच्या पाठिमागील वॉचमन रुममध्ये ते आपल्या पत्नी-मुलासोबत राहत होते.
रमेश धडेल नेहमी पत्नी कांचन यांना चारित्र्याच्या संशयावरून नेहमी शिविगाळी आणि मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत होते. महिन्यापूर्वी त्यांनी पत्नीवर खूनी हल्ला केला होता. बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता रमेश धडेल यांनी बंगल्याचे मालक आज येणार असल्याने बंगल्याची गच्ची स्वच्छ करण्यासाठी पत्नीला टेरीसवर जाण्यास सांगितले. त्यानंतर धडेल बंगल्याचे सर्व दरवाजे बंद करून स्वत: वर गेले. पत्नी काम करत असताना बाहेर अनैतिक संबंध असलेच्या संशयित कारणावरुन तिच्याशी भांडण सुरू केले.
धडेल यांना पत्नीचे डोके टेरेसवरील भींतीवर आपटले. त्यानंतर तेथे असणाऱ्या सिमेंट काँक्रिटचा चिरा उचलून त्यांच्या डोक्यात घालून खून केला. पत्नीचा आरडाओरडा ऐकून शेजारचे लोक बंगल्याजवळ गोळा झाले होते; परंतु सर्वच दरवाजे बंद असल्याने लोकांना बंगल्यावर जाता आले नाही. लोकांनी पोलिसांना फोन केला.पोलिस घटनास्थळी आल्यानंतर आरोपीने दरवाजा उघडला. त्या आधीच कांचन धडेल यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी रमेश धडेल यांना ताब्यात घेऊन अटक केली. घटनेची फिर्याद शहाजी दगडु साळवी यांनी पोलिसांत दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आण्णासो बाबर करीत आहेत.
ज्याची भीती होती तेच झाले…
चारित्र्याच्या संशयामुळे पती पत्नीत वारंवार वाद होत होता. त्यामुळे महिन्यापूर्वी धडेल यांनी पत्नीला दरवाजे बंद करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तेथे असणाऱ्या लहान मुलीने बंद दरवाजा उघडून मुलाला सांगितले होते. धडेल यांनी हात जोडून सर्वांची माफी मागत पोलीस तक्रार करू नका म्हणून विनंती केली होती. महिन्यापूर्वी खूनी हल्ल्याची तक्रार पोलिसात केली असती तर खूनाचा प्रकार झाला नसता. शेवटी ज्याची भीती होती तेच घडल्याची घटनास्थळी चर्चा होती.
मुलाच्या शुभमंगलापूर्वीच आईचा खून
धडेल यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मोठ्या मुलींची लग्न झाली आहेत तर खाजगीत नोकरीला असणाऱ्या मुलाचा पुढील आठवड्यात साखरपुडा आहे. घटना घडण्यापूर्वी धडेल यांनी पत्नीला नवीन चांदीची जोडवी आणून खूश केले होते. मुलाच्या लग्नामुळे घरात उत्साहाचे वातावरण असताना वडिलांनी आईचा खून करून तिला संपवल्याने आनंदावर विरजण आले आहे.
Web Summary : In Panhala, a husband, fueled by suspicion of infidelity, brutally murdered his wife with a cement slab. The watchman, already abusive, attacked her on a terrace. He was arrested, leaving the family shattered before their son's engagement.
Web Summary : पन्हाला में, बेवफाई के शक में एक पति ने सीमेंट के स्लैब से अपनी पत्नी की बेरहमी से हत्या कर दी। पहले से ही दुर्व्यवहार करने वाले चौकीदार ने छत पर उस पर हमला किया। उसे गिरफ्तार कर लिया गया, जिससे बेटे की सगाई से पहले परिवार बिखर गया।