इचलकरंजी: इचलकरंजी नगरपालिकेची महानगरपालिका झाल्यानंतर यंदा प्रथमच निवडून पार पडली. या निवडणुकीत भाजपने विरोधकांचा सुपडासाफ करत एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यामुळे नव्यानेच स्थापन झालेल्या या महापालिकेत भाजपचा पहिला महापौर बसणार असल्याचे स्पष्ट झाले. इचलकरंजीत महायुती विरुद्ध शिव-शाहू आघाडीतच दुरंगी लढत झाली. ६५ जागांसाठी २३० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. महापालिकेचा पहिला महापौर आपला बनविण्यासाठी सर्वच पक्षांनी चांगलाच जोर लावला होता. याठिकाणी अनेक वर्षांपासूनचे विरोधक असलेले माजी मंत्री प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर एकत्र आले. तर महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये एकमत न झाल्याने शिव-शाहू आघाडी स्थापन झाली. निवडणूक प्रचारादरम्यान दोन्हीकडून जोरदार राळ उडली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा याठिकाणी रोड शो देखील झाला होता.
कोल्हापुरात काँग्रेसच स'तेज'; 'या' तीन प्रभागात 'पंजा'ची छाप, कुठं फुललं कमळ, धनुष्यबाणाच काय...वाचाभाजपने याठिकाणी सर्वाधिक ४३ जागा जिंकल्या. तर विरोधी शिवशाहू आघाडीने १७ जागा मिळवल्या. शिंदेसेना, उद्धवसेनेबरोबरच राष्ट्रवादी अजित पवार गटानेही आपले खाते उघडले. शिंदेसेनेने ३, उद्धवसेना १ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने १ जागेवर विजयी मिळवला आहे. दिग्गजांना धक्काया निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुहास जांभळे, मंगला मुसळे, शिवशाहू आघाडीचे हिमानी चाळके, अब्रहम आवळे, शिंदेसेनेचे रवींद्र लोहार यांचा समावेश आहे.
विजयी उमेदवार असेप्रभाग क्रमांक - १अ- अनुसूचित जाती महिला स्वाती राजेंद्र लोखंडे- शिव शाहू आघाडीब-ओबीसीसचिन लालासो राणे - शिव शाहू आघाडीक- सर्वसाधारण महिलारूपाली नितीन कोकणे - शिव शाहू आघाडीड- सर्वसाधारणउदयसिंग मारुती पाटील – शिव शाहू आघाडी
प्रभाग क्रमांक - २अ- ओबीसी महिलायास्मीन मुसा तासगावे - शिव शाहू आघाडीब- सर्वसाधारण महिलापद्मा लक्ष्मण सावरतकर - शिव शाहू आघाडीक- सर्वसाधारणरणजीत गंगाराम जाधव - शिव शाहू आघाडीड - सर्वसाधारणपरवेझ लतिफ गैबान - शिव शाहू आघाडी
प्रभाग क्रमांक - ३अ - अनुसूचित जाती महिला प्रियंका प्रसाद इंगवले - भाजपब - ओबीसीयोगेश चांगदेव पाटील - भाजपक- सर्वसाधारण महिलासरिता भाऊसो आवळे - शिदेसेनाड- सर्वसाधारणअशोक रामचंद्र जांभळे - राष्ट्रवादी (अजित पवार)
प्रभाग क्रमांक - ४अ - ओबीसीसयाजी मारुती चव्हाण - शिव शाहू आघाडीब- सर्वसाधारण महिलामोनाली दत्तात्रय मांजरे - भाजपक - सर्वसाधारण महिलामनीषा संतोष कुपटे - भाजपड- सर्वसाधारणमनोज भीमाशंकर हिंगमिरे – भाजप
प्रभाग क्रमांक - ५अ-ओबीसीसतीश वसंतराव मुळीक - भाजपब - सर्वसाधारण महिलावैशाली सुनिल पोवार - भाजपक- सर्वसाधारण महिलाजुलेखा जहाँगीर पटेकरी - भाजपड- सर्वसाधारणशिवाजी संभाजी पाटील - उद्धवसेना
प्रभाग क्रमांक - ६अ- अनुसूचित जातीअलका अशोक स्वामी - भाजपब - ओबीसी महिलाकिरण श्रीरंग खवरे - भाजपक - सर्वसाधारण महिलाविजया सुनिल महाजन - भाजपड - सर्वसाधारणविठ्ठल पुंडलिक चौपडे - भाजप
प्रभाग क्रमांक - ७अ- अनुसूचित जाती महिलाक्रांती अब्राहम आवळे - शिव शाहू आघाडीब - ओबीसी महिलाप्रमिला रविंद्र जावळे - भाजपक - सर्वसाधारणनंदकुमार आनंदराव पाटील - शिव शाहू आघाडीड - सर्वसाधारणमदन सीताराम कारंडे - शिव शाहू आघाडी
प्रभाग क्रमांक - ८अ- ओबीसी महिलारूपा उदय बुगड - भाजपब - सर्वसाधारण महिलासंगीता राजू आलासे - शिव शाहू आघाडीक - सर्वसाधारणसंजय शंकरराव तेलनाडे - शिव शाहू आघाडीड - सर्वसाधारणरवींद्र वसंत माने - शिदेसेना
प्रभाग क्रमांक - ९अ - अनुसूचित जातीरुबेन सखाराम आवळे - भाजपब - ओबीसी महिलाध्रुवती सदानंद दळवाई - भाजपक - सर्वसाधारण महिलामनीषा प्रशांत नवनाळे - भाजपड - सर्वसाधारणउदय आनंदा धातुडे - भाजप
प्रभाग क्रमांक - १०अ- अनुसूचित जातीरवी साहेब रजपुते - भाजपब - ओबीसी महिलाविद्या मनोज साळुंखे - भाजपक - सर्वसाधारण महिलानूतन दिलीप मुथा - शिंदे सेना ड - सर्वसाधारणतानाजी बाळु पोवार - भाजपप्रभाग क्रमांक ११अ - ओबीसीप्रदीप नामदेव धोत्रे - भाजपब - सर्वसाधारण महिलावैशाली शशिकांत मोहिते - भाजपक - सर्वसाधारण महिलासारिका सुकुमार पाटील - भाजपड - सर्वसाधारणराजू संभाजी बोद्रे - भाजप
प्रभाग क्रमांक - १२अ - ओबीसीनितेश किरण पोवार - भाजप ब - सर्वसाधारण महिलासुरेखा अजितमामा जाधव - भाजपक - सर्वसाधारण महिलास्नेहल दीपक रावळ - भाजपड - सर्वसाधारणअनिल देवकरण डाळ्या - भाजप
प्रभाग क्रमांक - १३अ - ओबीसी महिलारूपाली अनंत सातपुते - भाजपब - सर्वसाधारण महिलाशशिकला माळसाकांत कवडे - भाजपक - सर्वसाधारणचंद्रकांत विष्णू शेळके - भाजपड - सर्वसाधारणअमरजीत राजाराम जाधव - शिव शाहू आघाडी
प्रभाग क्रमांक - १४अ - ओबीसी महिलासपना प्रमोद भिसे - भाजप ब - सर्वसाधारण महिलामेघा शहाजी भोसले - भाजपक - सर्वसाधारणअभिषेक रमाकांत वाळवेकर - भाजपड - सर्वसाधारणओंकार रामचंद्र सुर्वे - भाजप
प्रभाग क्रमांक - १५अ - ओबीसीराजू आण्णासो पुजारी - भाजपब - सर्वसाधारण महिलाज्योती नागेश पाटील - भाजपक - सर्वसाधारण महिलातेजश्री अमृत भोसले - भाजपड - सर्वसाधारणसंतोष बाबुराव शेळके - भाजप
प्रभाग क्रमांक - १६अ - ओबीसी महिलापूनम सचिन माळी - भाजपब - ओबीसीसुशांत बाळासो कलागते - भाजपक - सर्वसाधारण महिलास्मिता संजय तेलनाडे - शिव शाहू आघाडीड - सर्वसाधारण महिलाअरुणा प्रमोद बचाटे - भाजपइ - सर्वसाधारणसुनील शंकरराव तेलनाडे - शिव शाहू आघाडी
Web Summary : In Ichalkaranji's first municipal corporation election, BJP swept to power, dominating the Shiv-Shahu alliance. The BJP won 43 seats, paving the way for its first mayor. Several prominent candidates faced defeat.
Web Summary : इचलकरंजी के पहले नगर निगम चुनाव में भाजपा ने शिव-शाहू गठबंधन को पछाड़कर सत्ता हासिल की। भाजपा ने 43 सीटें जीतीं, जिससे उसके पहले महापौर का मार्ग प्रशस्त हो गया। कई प्रमुख उम्मीदवारों को हार का सामना करना पड़ा।