शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महापालिकेचे उत्पन्न वाढवले पाहिजे हो... पण, कुणी बरं ?; उत्पन्न अन् वाढत्या खर्चाचा ताळमेळ घालताना नाकीनऊ

By भारत चव्हाण | Updated: February 14, 2026 16:27 IST

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, नवीन संकल्पनांचा अभाव

भारत चव्हाणकोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेला गेल्या अनेक वर्षांपासून मर्यादित उत्पन्न आणि वाढता खर्च यांचा ताळमेळ घालताना नाकीनऊ येत आहेत. तरीही उत्पन्न वाढीसाठी प्रशासनाच्या पातळीवर फारसे गांभीर्याने प्रयत्न होत नसल्याचा अनुभव कायमचाच आहे. उत्पन्न वाढीचा जेव्हा विषय येतो तेव्हा घरफाळा, पाणीपट्टी वाढीचा विषय समोर येतो, पण याशिवाय उत्पन्नाचे अन्य स्त्रोत कसे निर्माण होतील याचाही विचार केल्यास किमान शंभर कोटींनी उत्पन्न वाढू शकते, असा अभ्यासकांचा दावा आहे.आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी सन २०२५-२०२६ सालाचे अंदाजपत्रक मागच्या वर्षी मांडले. त्यामध्ये ६३५ कोटींची अपेक्षित जमा धरण्यात आली होती. त्यापैकी ४३० कोटी ८४ लाखांचा महसूल मिळाला. वसुलीचे प्रमाण ६७ टक्के आहे. मार्चअखेर ही वसुली ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत जाईल. अंदाजपत्रकाची ही पारंपरिक पद्धत झाली, पण उत्पन्नाचे नवीन स्त्रोत शोधले गेले नाहीत. त्यामुळे जमा होणाऱ्या उत्पन्नातील बहुतांशी रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारावरच खर्च होते. स्वनिधीतून शहरातील विकासासाठी फारच मर्यादित निधी उपलब्ध होतो. त्यामुळे शासकीय अनुदानावर विसंबून राहावे लागण्याची वेळ प्रशासनावर येते.काय आहेत उत्पन्न वाढविण्याचे पर्यायघरफाळा वसुलीसाठी प्रयत्न कोल्हापूर शहरात जवळपास दीड लाखावर मिळकती आहेत. या मिळकतीमधील अंदाजे वीस ते पंचवीस टक्के मिळकतींना अद्याप घरफाळाच लागू झालेला नाही. अशा अनेक इमारती आहेत की त्यामध्ये वाढीव बांधकाम होऊनही त्यांची नोंद घरफाळा विभागाकडे नाही. जर नवीन इमारतींसह वाढीव बांधकाम केलेल्या मिळकतींना घरफाळा सुरु केला तर उत्पन्नात वाढ होऊ शकते.मार्केट विकसनाकडे दुर्लक्ष शहरात सध्या अस्तित्वात असलेली भाजी मार्केट तसेच नव्याने व्यापारी संकुल उभारण्याचे प्रयत्न केले गेले तर त्यापासून उत्पन्न वाढू शकते. बीओटीवर व्यापारी संकुल उभारणे हा मुद्दा काही जणांच्या फायद्याचा असला तरी तो दीर्घकाळाचा विचार करता महापालिका प्रशासनाच्या दृष्टीने नुकसानीचा आहे. त्यामुळे अशी व्यापारी संकुले स्वत: महापालिकेने उभारली आणि भाड्याने दिली तर चांगले उत्पन्न मिळू शकेल. जुन्या भाजी मंडईदेखील विकसित केल्यास आणि त्याची क्षमता वाढविली तर उत्पन्न वाढणार आहे.दुकान गाळ्यांचे भाडे थकले महापालिकेचे सुमारे दोन हजार दुकान गाळे आहेत. या दुकान गाळ्यांच्या भाड्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत आहे. २०१५ ते २०१९ सालातील मोठी थकबाकी राहिली आहे. याबाबत निर्णय घेऊन नवीन करार केले तर महापालिकेचे उत्पन्न वाढेल आणि गाळेधारकांना एक हमी मिळेल.विनाशुल्क फेरीवाल्यांचा व्यवसायकोल्हापूर शहरात जवळपास सात हजारांच्या पुढे फेरीवाले, केबिनधारक, विक्रेते रस्त्याच्या कडेला व्यवसाय करुन स्वत:ची रोजीरोटी भागवितात. पण महापालिकेला त्यांच्यापासून काहीच मिळत नाही. फेरीवाल्यांच्या मागण्याप्रमाणे त्यांचे योग्य प्रकारे पुनर्वसन करुन त्यांच्यावर विशिष्ट शुल्क लावले तर रोजचे उत्पन्न वाढणार आहे.विनापरवाना यात्रीनिवास सुरुअंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनाला रोज असंख्य भाविक येत असतात. कधी कधी त्यांच्या राहण्याची सोय येथे होत नाही इतके भाविक येतात. कोल्हापूर शहरात जवळपास ५०० यात्री निवास आहेत. काही मोजके यात्रीनिवास चालक सोडले तर बहुतांशी यात्रीनिवास विनापरवाना आहेत. त्यांना परवाने घेण्यास भाग पाडून नियमित करुन दिल्यास चांगले उत्पन्न वाढू शकते.पार्किंग सुविधा वाढविल्या पाहिजेतशहरात पार्किंगचा विषय अतिशय गंभीर झाला आहे. त्यामुळे पार्किंगची ठिकाणे निश्चित करुन ती ‘पे अँड पार्क’ करिता उपलब्ध करुन दिल्यास उत्पन्न तर वाढेलच शिवाय नागरिकांना सुविधाही मिळेल. ताराबाई रोडवरील बहुमजली पार्किंग अद्याप पूर्ण क्षमतेने सुरु करता आलेले नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Municipal Corporation needs revenue boost; who will do it?

Web Summary : Kolhapur Municipal Corporation struggles with revenue. Experts suggest increasing property tax coverage, developing markets, resolving shop rent arrears, regulating street vendors, licensing guesthouses, and improving parking facilities to boost income.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूर