शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

LokSabha Result 2024: हातकणंगलेत यंदा वंचित फॅक्टर निष्पभ्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 12:58 IST

वंचित फॅक्टर न चालण्याची कारणे.. जाणून घ्या

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मागील निवडणुकीप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर चालेल आणि महाविकास आघाडीबरोबरच राजू शेट्टींचे गणित बिघडेल, अशी अपेक्षा महायुतीच्या नेत्यांनी होती. पण, मतदारांनी ‘वंचित’ फॅक्टर चाललाच नाही. मागील निवडणुकीत ‘वंचित’च्या उमेदवारांना सव्वा लाख मते घेतली होती, पण यावेळेला डी. सी. पाटील यांना २५ हजारांच्या आतच मतदारांनी थांबवले.लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला झटका दिला होता. दहा वर्षे खासदार राहिलेले ‘स्वाभिमानी’चे राजू शेट्टी यांचा ९४ हजार मतांनी पराभव झाला होता. यावेळी ‘वंचित’च्या उमेदवाराने तब्बल सव्वा लाख मते घेतली होती. त्या प्रमाणेच यावेळेलाही मतांचे धुव्रीकरण होऊन त्याचा फायदा महायुतीला होईल, अशी खेळी भाजप-शिंदे गटाची होती. कोल्हापुरात शाहू छत्रपती यांना पाठिंबा दिला, पण हातकणंगलेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांना रिंगणात उतरून आघाडीसह राजू शेट्टी यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. त्या दृष्टीने वंचितने प्रचार यंत्रणाही सक्रिय करून हवा तयार केली, पण ती हवा मतदान यंत्रापर्यंत पोहोचवता आली नाही. डी. सी. पाटील यांना पडलेली मते पाहता, वंचित फॅक्टर या वेळेला हातकणंगलेत निष्पभ्र ठरला असेच म्हणावे लागेल.

वंचित फॅक्टर न चालण्याची कारणे :

  • मुस्लिम व मागासवर्गीय समाज एकसंध राहिला.
  • उमेदवार म्हणून डी. सी. पाटील हे फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत.
  • बहुरंगी लढतीत तिन्ही प्रमुख उमेदवाराकडून लावलेल्या जोडण्या प्रभावी ठरल्या.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगलेlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी