शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पंचगंगा साखर कारखान्यांच्या निवडणुकीला स्थगिती, सभासदांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 11:41 IST

कबनूर : गंगानगर (ता. हाकणंगले) येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला शुक्रवारी न्यायालयाने स्थगिती दिली. केंद्रीय ...

कबनूर : गंगानगर (ता. हाकणंगले) येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला शुक्रवारी न्यायालयाने स्थगिती दिली. केंद्रीय सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांनी राबवलेली बिनविरोध निवडणूक प्रक्रिया रद्द करत नव्याने निवडणूक लावली होती. त्याविरोधात कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांचे समर्थक बाबासाहेब भीमराव मगदूम (कसबा सांगाव) व इतरांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सहा आठवड्यात केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.पंचगंगा साखर कारखाना सध्या रेणुका शुगर्सकडे भाडेतत्त्वावर आहे. त्याची मुदत २०२९ मध्ये संपणार आहे. दरम्यानच्या २०२५ ते २०३० या कालावधीसाठी केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाने १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली. यामध्ये कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांच्या नेतृत्वाखालील सर्वच जागा बिनविराेध निवडून आल्या होत्या. याविरोधात अर्ज बेकायदेशीरपणे अवैध केल्याची तक्रार रजनी मगदूम यांनी प्राधिकरणाकडे केली होती. त्यानंतर प्राधिकरणाने ३ एप्रिलला निवडणूक प्रक्रियाच रद्द ठरवत, नव्याने प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवार (दि. २९) पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार होती.

मात्र, बिनविरोध निवडणूक प्रक्रिया कारखान्याच्या उपविधीतील तरतुदीनुसारच राबवली होती. त्याला प्राधिकरणाने दिलेली स्थगिती अयोग्य असल्याची याचिका बाबासाहेब मगदूम यांनी दाखल केली होती. तर, ज्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राबवलेली प्रक्रिया प्राधिकरणाने रद्द ठरवली, त्यांच्यावरच पुन्हा कशी जबाबदारी दिली? मग निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होणार का? अशी विचारणा विरोधी गटाकडून झाल्याचे समजते. यावर, सहा आठवड्यात खुलासा करण्याचे आदेश न्यायालयाने प्राधिकरणाला दिले आहेत.

प्राधिकरणाच्या सूचनेनुसार कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू होती. न्यायालयाने स्थगिती दिली आहे, न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. - डॉ. संपत खिलारी (निवडणूक निर्णय अधिकारी, पंचगंगा कारखाना) 

केंद्रीय सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या नव्याने निवडणूक घेण्याच्या आदेशाचे पालन आम्ही केले. नव्याने सभासदांच्या दारी न्याय मागत आहोत. आम्हाला सभासदांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. न्यायालयाचा हाही निर्णय आम्हाला मान्य असून त्याचे पालन करू. - पी. एम. पाटील (अध्यक्ष, पंचगंगा कारखाना)

निवडणुकीत सभासदांचा आम्हाला मिळत असलेला पाठिंबा पाहून विरोधकांनी स्थगिती आणण्याचा डाव केला. त्यांना आता निवडणूक नको असून निवडणुकीतून पळ काढण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. न्यायालयीन लढाई नंतर सभासदांच्या हक्काकरिता सुरू केलेला हा संघर्ष सातत्याने चालूच राहील. - रजनीताई मगदूम (नेत्या, विरोधी आघाडी)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक 2024Courtन्यायालय