शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

मिरजकर तिकटीला घुमला वारकऱ्यांचा जयघोष, कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 13:45 IST

पारंपरिक वाद्याची सुरावट तर कुठे टाळ-मृदुगाचा गजर, भगव्या पताका अन मुखी विठूनामाचा एकच जयघोष अशा भक्तीमय वातावरणात शनिवारी दुपारी कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटीला गणेश विसर्जनाला सुरुवात झाली.

कोल्हापूर : कुठे साऊंड सिस्टीमचा दणदणाट, कुठे पारंपरिक वाद्याची सुरावट तर कुठे टाळ-मृदुगाचा गजर, भगव्या पताका अन मुखी विठूनामाचा एकच जयघोष अशा भक्तीमय वातावरणात शनिवारी दुपारी कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटीला गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. शहरातील मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीने याची सुरुवात होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या मंडळाची श्रीची आरती होऊन मिरवणुकीला मोठ्या जल्लोषी वातावरणात सुरुवात झाली. दरवर्षी विसर्जन मिरवणुकीचा पहिला मान या मंडळाच्या गणपतीला असतो. ढोल-ताशांचा अखंड गजर, झांथ पथकाने खासबाग मैदानाचा परिसर दुमदुमुन गेला. यावेळी खासदार शाहू छत्रपती, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिकेच्या प्रशासक के.मंजुलक्ष्मी उपस्थित होते.तुकाराम माळी मंडळाची श्रीची मिरवणूक मिरजकर तिकटीपासून पुढे सरकल्यानंतर शहरातील इतर मंडळांच्या बप्पांची मिरवणूक सुरु झाली. सकाळी अकरा वाजल्यापासून मिरजकर तिकटी ते बिनखांबी मार्गावर मंडळांची रीघ लागली. लेटेस्ट गणेश तरुण मंडळ व मंगळवारपेठेतील सनगर तालीम मंडळांच्या मिरवणुकीत वारकरी दिंडीने अवघे वातावरण पंढरीमय करुन टाकले. टाळ-मृदुंगाचा एकच गजर करत विठूमाऊलीचा जयघोष करण्यात आला. शाहुपुरीतील पाचबंगला तरुण मंडळाच्या मिरवणुकीत बालचिमुकल्यांनी वारकरी दिंडी काढली. दरम्यान, दुपारी पावने एकपर्यंत शहरातील बहुतांश गणेश तरुण मंडळांचे बप्पा मिरजकर तिकटीच्या मार्गावर येऊन थांबले होते. मिरजकर तिकटी-बिनखांबी गणेश मंदिर-महाद्वार रोड-पापाची तिकटी गंगावेशमार्गे इराणी खण या मार्गावर विसर्जन मिरवणुका निघत असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर