शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘गोकुळ’ बिनविरोधसाठी विनय कोरे यांना संचालकांचे साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 12:13 IST

सकारात्मक चर्चेची ग्वाही : लवकरच इतर नेत्यांचीही संचालक भेट घेणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी मागणी संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्यासह संचालक मंडळाने बुधवारी ‘जनसुराज्य’ पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांच्याकडे केली. संघाचे हित पाहता, बिनविरोधसाठी आपण सगळ्यांशी सकारात्मक चर्चा करु, अशी ग्वाही त्यांनी दिल्याचे समजते.‘गोकुळ’च्या संचालक मंडळाची मुदत ४ मे २०२६ रोजी संपत आहे. सध्या निवडणूकीची प्रक्रिया सुरु आहे. महायुती म्हणून निवडणूकीला सामोरे जाण्याची घोषणा नेत्यांनी केली आहे. पण, निवडणूकीतील स्पर्धा पाहता आणि त्यातून होणारा खर्च टाळण्यासाठी बिनविरोधसाठी प्रयत्न व्हावेत, अशी चर्चा ‘गोकुळ’च्या वर्तूळात सुरु आहे. बुधवारी संघाच्या संचालक मंडळाची बैठक होती. त्यानंतर अध्यक्ष मुश्रीफ यांच्यासह संचालक मंडळाने वारणानगर (ता. पन्हाळा) येथे जाऊन आमदार कोरे यांची भेट घेतली. यामध्ये, संघाच्या संचालक मंडळाची मुदत संपत असल्याने संभाव्य प्रशासक नियुक्त्याच्या चर्चा, अवसायक नेमणूक बाबत ११०८ दूध संस्थांना अंतरिम काढलेला आदेश यासह विविध विषयावर चर्चा झाली. यावेळी, ‘गोकुळ’च्या निवडणूकीतील इर्षा पाहता ही निवडणूक नेत्यांसह संचालकांना परवडणारी नसल्याचे सांगत बिनविरोधसाठी आपण प्रयत्नशील असल्याचे कोरे यांनी सांगितल्याचे समजते. दरम्यान, याबाबत आमदार सतेज पाटील यांची संचालक मंडळ लवकरच भेट घेणार आहे.

करवीर, राधानगरीच्या संचालकांचे कान टोचले!संघाच्या मागील निवडणूकीत ‘करवीर’, ‘राधानगरी’ तालुक्यातील संचालकांनी गडहिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यातील उमेदवारांना मतदान केले नसल्याचा मुद्दा आमदार कोरे यांनी उपस्थित केला. तुम्ही तसे करणार असाल तर यावेळी तेही तसेच करतील, असा सूचक इशारा देत कान टोचले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur directors urge Vinay Kore for unopposed Gokul election.

Web Summary : Gokul directors, led by Navid Mushrif, appealed to Vinay Kore to facilitate an unopposed election, considering the cooperative's interests and avoiding unnecessary expenses. Kore assured positive discussions. Previous voting discrepancies were also addressed.