शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरलेला ‘ब्रिज’ पुन्हा बास्केटमध्ये, नितीन गडकरींच्या हस्ते झाली होती पायाभरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 17:42 IST

वर्षभरापूर्वी झालेल्या पायाभरणीचे पुढे काय झाले हे ‘लोकमत’ने तपासले

कोल्हापूर : रस्ते विकासामध्ये चर्चेचा विषय ठरलेला ‘बास्केट ब्रिज’ पुन्हा लांबणीवर पडला आहे. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बरोबर एक वर्षापूर्वी या ब्रिजची पायाभरणी झाली. परंतु पुलाची शिरोलीजवळ पिलरचा सव्वाचार किलोमीटरचा नवा फ्लाय ओव्हर ब्रिज बांधण्याचा निर्णय झाल्याने साहजिकच बास्केट ब्रिज किमान तीन वर्षांसाठी लांबणीवर पडला. राजकीयदृष्ट्या चर्चेचा ठरलेला हा ब्रिज कधी होतोय याची कोल्हापूरकरांनाही उत्सुकता आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या पायाभरणीचे पुढे काय झाले हे ‘लोकमत’ने तपासले.याआधीच्या पुराचा अभ्यास करून महापुरात संपर्क तुटू नये आणि कोल्हापूर शहराचे वेगळेपण दिसावे आणि राष्ट्रीय महामार्गावरून पुण्या-मुंबईहून येणाऱ्या नागरिकांना थेट कोल्हापूर शहरात विनासायास प्रवेश मिळावा म्हणून पाच वर्षांपूर्वी खासदार धनंजय महाडिक यांनी बास्केट ब्रिजची संकल्पना मांडून तो मंजूरही करून घेतला. पुणे-बंगळुरू महामार्गावर शिरोली येथून शहरात येण्यासाठी या बास्केट ब्रिजची सुरुवात होणार होती.महापुरातही कोल्हापूरच्या संपर्क तुटणार नाही

  • दीड किलोमीटरच्या या पुलासाठी १८० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. महाडिक भाजपकडून राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर त्यांनी पुन्हा बास्केट ब्रिजच्या कामाचा पाठपुरावा केला आणि वर्षभरापूर्वी दि. २८ जानेवारीला मंत्री गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजनही केले.
  • बास्केट ब्रिजमुळे महापुराच्या काळात कोल्हापूर शहराचा संपर्क तुटणार नाही, असे मंत्री गडकरी यांनी भाषणात जाहीर केले.
  • परंतु नंतर पुन्हा जूनमध्ये महापुराच्या काळात शिरोलीजवळून पिलरचा नवा पूल बांधण्याची आग्रही मागणी नागरिकांनी लावून धरली. याची दखल लोकप्रतिनिधींनाही घ्यावी लागली. परिणामी आधीचे नियोजन रद्द झाले.
  • आता शिरोलीपासून सुरू होऊन उचगाव फाट्याजवळ खाली उतरणारा सव्वाचार किलोमीटरचा फ्लाय ओव्हर ब्रीज करण्यात येणार आहे. त्याचे नियोजन सुरू आहे. याच रस्त्यांवर बास्केट ब्रिज आधारित असल्यामुळे साहजिकच या पुलाचेही बांधकाम आता लांबणीवर पडले.

नागरिकांच्या मागणीस्तव महापुराचे पाणी निचरा होण्यासाठी पिलरचा मोठा पूल उभारण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. याच रस्त्यांवर बास्केट ब्रिज असल्याने साहजिकच या नव्या पुलाचे बांधकाम करतानाच हा पूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम लांबणीवर पडले आहे. जुन्या नियोजनानुसार आतापर्यंत पुल झाला असता. परंतू लोकहितास्तव या ठिकाणी फ्लाय ओव्हर ब्रीज होणार असून, त्यातच बास्केट ब्रिजच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे. - धनंजय महाडिक, खासदार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गfloodपूरNitin Gadkariनितीन गडकरीDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक