Local Body Election Results 2025: शिरोळमध्ये सत्तांतर; आमदार यड्रावकर, मानेंना धक्का; शिव-शाहू आघाडीला बहुमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 18:26 IST2025-12-21T18:22:13+5:302025-12-21T18:26:07+5:30
दोन अपक्षांनी खाते उघडले

Local Body Election Results 2025: शिरोळमध्ये सत्तांतर; आमदार यड्रावकर, मानेंना धक्का; शिव-शाहू आघाडीला बहुमत
शिरोळ : शिरोळ नगरपालिकेच्या दुसर्या पंचवार्षीक निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार अशोकराव माने या दोघांच्या आघाडींचा पराभव करत काँग्रेस, स्वाभिमानी, यादव गट यांच्या शिवशाहू आघाडीने नगराध्यक्ष पदासह 15 नगरसेवक निवडून आणत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.
आमदार यड्रावकर यांच्या शाहू आघाडीला 3 जागेवर समाधान मानावे लागले तर आमदार अशोकराव माने यांच्या ताराराणी आघाडीला पराभावासह एकही जागा मिळाली नाही. तर, दोन अपक्षांनी खाते उघडले आहे.
शिरोळ येथील तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आज, रविवारी मतमोजणी झाली. सुरुवातीपासूनच मताची आघाडी घेतल्याने शिवशाहू आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार योगिता कांबळे व 15 उमेदवार निवडून आले. योगिता कांबळे यांना दहा हजार 595 मते मिळाली. तर विरोधी शाहू आघाडीच्या उमेदवार श्वेता काळे यांना 4658 तर आमदार अशोकराव माने यांच्या सूनबाई ताराराणी आघाडीच्या पदाच्या उमेदवार सारिका माने यांना 3563 मते मिळाली.