शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श निवडणुकीसाठी ‘तेरणी पॅटर्न’!

By admin | Updated: December 19, 2014 00:46 IST

सहकाराला मार्गदर्शक : बिनपैशाची निवडणूक

राम मगदूम - गडहिंग्लज --कोणत्याही सहकारी संस्थेची निवडणूक लागली की, संस्थेवर पडणाऱ्या निवडणूक खर्चाचा बोजा, उमेदवारांकडून होणारी पैशांची उधळपट्टी, सत्ता संघर्षातील आरोप-प्रत्यारोप, ईर्षा आणि हेवेदाव्यांमुळे त्या संस्थेतील, किंबहुना गावातील वातावरणच बिघडून जाते. मात्र, गडहिंग्लज तालुक्यातील तेरणीच्या बसवेश्वर सहकारी दूध संस्थेने राबविलेली बिनपैशाची निवडणूक प्रक्रिया सहकारी क्षेत्राला मार्गदर्शक ठरली आहे.ज्येष्ठ सेंद्रिय शेतीतज्ज्ञ अरुण देसाई यांच्या मार्गदर्शनाखालीच गावात महात्मा बसवेश्वरांच्या नावानेच दूध व पतसंस्था स्थापन झाल्या. स्थापनेपासून या संस्थांच्या सर्वच निवडणुका बिनविरोध झाल्या. मात्र, खुल्या वातावरणात पारदर्शक लोकशाही पद्धतीने संचालक मंडळ निवडण्यासाठी त्यांनी ही नवी संकल्पना तीन वर्षांपूर्वी राबवली. त्याची नियमावलीदेखील वार्षिक सभेत मंजूर करून घेतली.सर्वसाधारण खुला, महिला, आर्थिक दुर्बल व मागास अशा चार गटांतून संचालक मंडळाची निवड केली जाते. वेगवेगळ्या रंगांच्या कागदावर मतदार यादी व मतपत्रिका तयार केल्या. मतदार याद्या संस्थेच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केल्या.मतपत्रिका टाकण्यासाठी चार सीलबंद मतपेट्या कार्यालयात ठेवल्या. प्रत्येक गटातून निवडावयाच्या संचालकांची नावे लिहून मतपेटीत संकलित केली. निरक्षर सभासदांना प्रतिनिधीमार्फत ‘मत’ नोंदविली.आठवडाभर मतदान घेऊनदेखील मतदान न केलेल्या सभासदांच्या घरोघरी मतपेट्या फिरवून १०० टक्के मतदान नोंदविले. सभासदांनी स्वेच्छेने लेखी नोंदविलेल्या मतपत्रिकांवरून संचालक मंडळाची रचना केली. त्यासाठी प्राधान्यक्रमाचाही वापर केला. राज्य निवडणूक प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात जारी केलेल्या खर्चिक व वादग्रस्त फतव्याच्या पार्श्वभूमीवर अनुकरणीय ‘तेरणी पॅटर्न’ची चर्चा सुरू आहे.अर्ज, अनामत, प्रचार नाहीउमेदवारी अर्ज नाही, अनामत रक्कम नाही, सूचक-अनुमोदक व प्रचाराचीही गरज नाही, अशा पद्धतीने बिनपैशाची ही निवडणूक झाली. त्यासाठी संस्थेचा व उमेदवारांचाही रुपया खर्च झाला नाही. ४०० सभासद व दररोज १२५० लिटर दूध संकलन असणाऱ्या या संस्थेने आदर्श निवडणूक पद्धतीचा वस्तुपाठच घालून दिला आहे.‘विश्वास आणि विश्वस्त’ खुल्या वातावरणात मोठ्या विश्वासाने सभासदांनी संचालकांना निवडले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने विश्वस्ताच्या भूमिकेतूनच काम सुरू असून, आपलीच संस्था असल्याची भावना संचालक व सभासदांतही आहे.