शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अग्निशमन दलाकडे येणार टर्न टेबल लॅडर, राज्य सरकारचे चार कोटी अर्थसहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 1:04 PM

एकीकडे शहरात उंच इमारती उभ्या राहत असताना दुसरीकडे अशा इमारतींना अग्निशमन विषयक सुविधा देणे महापालिका प्रशासनास अशक्य झाले होते, त्यामुळे अग्निशमन दलाकडे टर्न टेबल लॅडर वाहन करण्याचा निर्णय घेतला असून त्याकरीता राज्य सरकारने आपल्या हिश्शाचे चार कोटी रुपये महापालिकेला मंजूर केले आहे. जपान किंवा जर्मन बनावटीचे हे अत्याधुनिक वाहन पुढील काही महिन्यांत अग्निशमन दलात सहभागी होईल, अशी अपेक्षा आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देअग्निशमन दलाकडे येणार टर्न टेबल लॅडरराज्य सरकारचे चार कोटी अर्थसहाय्य

कोल्हापूर : एकीकडे शहरात उंच इमारती उभ्या राहत असताना दुसरीकडे अशा इमारतींना अग्निशमन विषयक सुविधा देणे महापालिका प्रशासनास अशक्य झाले होते, त्यामुळे अग्निशमन दलाकडे टर्न टेबल लॅडर वाहन करण्याचा निर्णय घेतला असून त्याकरीता राज्य सरकारने आपल्या हिश्शाचे चार कोटी रुपये महापालिकेला मंजूर केले आहे. जपान किंवा जर्मन बनावटीचे हे अत्याधुनिक वाहन पुढील काही महिन्यांत अग्निशमन दलात सहभागी होईल, अशी अपेक्षा आहे.कोल्हापूर शहराची हद्दवाढ न झाल्यामुळे आडव्या विस्ताराऐवजी शहराचा उभा विस्तार होऊ लागला आहे. महानगरपालिका क्षेत्रात अंतर्गत लागू झालेल्या ‘ड’ वर्ग नियमावलीनुसार अकरा माळ्यावरुन अठरा माळ्यांपर्यंत परवानगी देण्यात आली; परंतु ही परवानगी देताना अग्निशमनविषयक सुविधा आपल्या स्वत:च्या जबाबदारीवर देण्याच्या बंधने घातली होती. त्यामुळे उंच इमारती बांधण्याची मुभा असतानाही केवळ या बंधनामुळे त्या बांधता येत नव्हत्या.याकरिता महापालिका प्रशासनाने टर्न टेबल लॅडर वाहन घेण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. सुरवातीला हे वाहन घेण्यास ७५ टक्के राज्य सरकार तर २५ टक्के महापालिका असा हिस्सा होता. महापालिकेच्या या प्रस्तावानुसार कोणत्या बनावटीचे वाहन घ्यायचे, त्याची तांत्रिक क्षमता या अनुषंगाने छाननी झाली. त्यातून जपान किंवा जर्मनी बनावटीचे वाहन घेण्यास छाननी समितीने मान्यता दिली. गेल्या दोन वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू होती.अर्थसहाय्याच्या प्रस्तावावर देखील निर्णय होणे बाकी होते. नुकतेच राज्य सरकारने या प्रस्तावास अनुसरुन चार कोटींचा निधी मंजूर केला आहे. वास्तविक टर्न टेबल लॅडर वाहन घेण्याकरती दहा ते अकरा कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे पन्नास टक्क्यांनुसार पाच ते साडेपाच कोटी रुपये मिळायला हवे होते. मात्र, प्रत्यक्षात चार कोटी रुपयेच मंजूर झाले आहेत. त्यामुळे महापालिका तिजोरीवर त्याचा भार पडणार आहे.निधी मंजुरीचा अद्याप कोणताही अध्यादेश महापालिका प्रशासनाकडे प्राप्त झालेला नाही. तरीही तो काही दिवसांनी पोहोचण्याची शक्यता असून तो आल्यानंतरच प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळास सादर करावा लागेल. त्यानंतरच पुढील प्रक्रिया राबविली जाईल. या सगळ्या प्रक्रियेत किमान चार-सहा महिने जाण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरfireआग