शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

टोल कायमचा रद्द करावा

By admin | Updated: August 27, 2015 00:52 IST

कृती समितीचे ठिय्या आंदोलन : लवकर निर्णय घेण्याचे आवाहन

कोल्हापूर : शहरातील रस्ते विकास प्रकल्पाच्या मूल्यांकनाची रक्कम निश्चित करून ती देण्याचा अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आयआरबी कंपनीला टोलवसुली करू दिली जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही बुधवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीला दिली. दरम्यान, टोलवसुली सुरू होऊ नये आणि राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन टोल कायमचा रद्द करावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कृती समितीने बुधवारी सकाळी तासभर ठिय्या आंदोलन केले. रस्ते विकास प्रकल्पाच्या मूल्यांकनाकरिता नेमलेल्या समितीच्या मूल्यांकनावर पंधरा दिवसांत अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ११ आॅगस्ट रोजी दिले होते; तसेच तोपर्यंत टोलवसुली स्थगित ठेवावी, असे आवाहनही ‘आयआरबी’ला केले होते. ही मुदत बुधवारी संपल्यामुळे टोलवसुली पुन्हा सुरू होईल, या भीतीने सर्वपक्षीय कृती समितीने ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सर्वपक्षीय कार्यकर्ते सकाळी अकरा वाजता शिरोली जकात नाक्याजवळ जमले होते. पालकमंत्र्यांचे आश्वासन जोपर्यंत टोलचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत आयआरबी कंपनीला टोलवसुली करू देणार नाही. तशी सूचना संबंधितांना दिली असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपणाशी फोनवर बोलताना दिली असल्याचे निवास साळोखे यांनी आपल्या भाषणात सांगितले. तोडगा काढण्यास कितीही अवधी लागला तरी टोलवसुली सुरू होणार नाही, असेही पालकमंत्र्यांनी सांगितल्याचे साळोखे म्हणाले. लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणीही साळोखे यांनी व्यक्त केली. जर लवकर तोडगा निघाला नाही आणि टोलवसुली पुन्हा सुरू झाली तर मात्र पुन्हा नव्याने संघर्ष उभा करावा लागेल, असा इशारा साळोखे यांनी दिला. महापालिकेवर भुर्दंड नको राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री एकनाथ शिंदे यांची आपण नुकतीच भेट घेतली असून, मूल्यांकनातील एक रुपयाचा बोजाही महापालिकेवर न टाकता सर्व रक्कम राज्य सरकारने भागवावी, अशी मागणी केल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी दिली. जर ‘आयआरबी’ने ५५० कोटींची किंमत मागितली असली तर ती आम्ही मान्य करणार नाही, सरकारने नेमलेल्या समितीचे मूल्यांकन आणि त्यावर होणारे व्याज द्यावे, अशी आमची भूमिका असल्याचे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. पुन्हा फसगत होऊ नये महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर चालढकल करून पुन्हा जनतेची फसवणूक होणार नाही, याची सरकारने खबरदारी घ्यावी, असे आवाहन नगरसेवक राजेश लाटकर यांनी केले. मागील सरकारच्या काळात आम्ही नगरसेवकांनी राजीनामे देण्याची तयारी केली; पण निर्णय घेण्याचे आश्वासन देऊनही टोल रद्द झाला नाही. त्यामुळे आताच्या सरकारने तातडीने निर्णय घेऊन टोल रद्द करावा, अशी मागणी लाटकर यांनी केली. यावेळी महापौर वैशाली डकरे, सभागृह नेता चंद्रकांत घाटगे, महेश जाधव, नामदेव गावडे, भगवान काटे, अशोक पोवार, अ‍ॅड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, सुभाष जाधव, रामभाऊ चव्हाण, व्यंकाप्पा भोसले, अ‍ॅड. विवेक घाटगे, अ‍ॅड. प्रकाश मोरे, विजय कुलकर्णी, लालासाहेब गायकवाड, समीर नदाफ, बंकट थोडगे, बाबासाहेब भुयेकर, हंबीरराब मुळीक, वसंत मुळीक, श्रीकांत भोसले, आदींनी ठिय्या आंदोलनात भाग घेतला. (प्रतिनिधी)‘आयआरबी’चा बोका, दिसेल तिथे ठोका!कार्यकर्त्यांनी सुरुवातीस घोषणाबाजी केली, ‘आयआरबीचा बोका, दिसेल तिथे ठोका’यासह टोल आम्ही देणार नाही, या ‘आयआरबीचं करायचं काय; खाली डोकं, वर पाय’ अशा घोषणांनी परिसर पुन्हा एकदा दणाणून गेला. दिलीप देसाई हे राज्य सरकारविरोधात घोषणा द्यायला लागल्यानंतर कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, रामभाऊ चव्हाण, सुरेश जरग, आदींनी त्यांना रोखले. आपले आंदोलन हे सरकारविरोधात नाही, तर ‘आयआरबी’विरोधात असून, ज्या काही घोषणा द्यायच्या त्या कंपनीच्या विरोधात द्या, अशी सूचना साळोखे यांनी केली.