शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात पुन्हा तणाव, शिक्षिकेच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल; हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 12:07 IST

संबंधित शिक्षिकेने निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन माफी मागावी यावर कार्यकर्ते ठाम

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात गत आठवड्यात झालेल्या हिंसाचाराच्या जखमा अजून मिटत नाहीत, तोच शुक्रवारी उपनगरातील एका नामांकित कॉलेजच्या शिक्षिकेच्या वक्तव्याच्या एका व्हिडिओने तणाव निर्माण झाला. संबंधित शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवताना विद्यार्थ्यांनीच हा व्हिडिओ बनवला असून, शुक्रवारी तो समाजमाध्यमावर माेठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओतील वक्तव्यावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. संबंधित शिक्षिकेने निवृत्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येऊन माफी मागावी यावर कार्यकर्ते ठाम राहिले. त्यामुळे निवृत्ती चौकात सायंकाळी मोठा जमाव जमला. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांनी या कार्यकर्त्यांची समजूत काढली. मात्र, कार्यकर्ते मागणीवर ठाम होते. घोषणा देत हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोर्चाने निघाल्यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्यांना सोडून देण्यात आले. संबंधित प्राध्यापक महिलेची कॉलेजमध्ये सिन्सिअर प्राध्यापक अशी प्रतिमा आहे.शिक्षिकेवर शिस्तभंगाची कारवाई दरम्यान, रात्री या संदर्भात केआयटी कॉलेजचे संचालक डॉ. मोहन वनरोटी यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले. त्यात म्हटले आहे की, त्या व्हिडीओमधील वक्तव्याविषयी महाविद्यालय प्रशासन सहमत नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाविद्यालयाने पाच जणांची समिती नेमली आहे. चौकशीचा अहवाल येईपर्यंतच्या कालावधीसाठी शिस्तभंगाची कारवाई म्हणून सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. समितीच्या अहवालानंतर संबंधित व्यक्तीवर पुढील कारवाई केली जाईल. कोल्हापूरचा सामाजिक सलोखा जोपासण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHindutvaहिंदुत्वTeacherशिक्षक