शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
2
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
4
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
5
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
6
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
7
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
8
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
9
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
10
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
11
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
12
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
13
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
14
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
15
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
16
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
17
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
18
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
19
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका क्षेत्रात ३१ दिवसांत दहा हजारांवर रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST

कोल्हापूर : महापालिका क्षेत्रात मे महिन्यात तब्बल १० हजार ७२५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली, तर २५१ व्यक्तींचा मृत्यू झाला. ...

कोल्हापूर : महापालिका क्षेत्रात मे महिन्यात तब्बल १० हजार ७२५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली, तर २५१ व्यक्तींचा मृत्यू झाला. एका महिन्यात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्यामुळे प्रशासनाच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे प्रशासन चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे रुग्णसंख्या वाढल्याचे सांगत असले तरी कोरोना संसर्गाने शहराला विळख्यात घेतले आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

कोल्हापूर महापालिका प्रशासन कोरोना संसर्गाला रोखण्याचे कसून प्रयत्न करत आहे, असा दावा केला जातो. परंतु संसर्ग कमी होण्याऐवजी तो वाढत असल्याचे दिसून येत आहे. एकट्या मे महिन्यात १० हजार ७२५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली, तर २५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्यात ५४४७ नवीन रुग्ण आढळून आले होते. त्याच्या तुलनेत मे महिन्यातील रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे.

गृह अलगीकरण, कॉन्टक्ट ट्रेसिंगमध्ये दाखविलेला हलगर्जीपणा यामुळे कोल्हापूर महापालिका हद्दीतील रुग्णसंख्या वाढली आहे. कोरोनाच्या पहिल्या साथीवेळी प्रशासनाने जी तयारी केली होती, त्याच्या तुलनेत दुसऱ्या साथीच्या वेळी कोरोनाला रोखण्याचे उशिरा सुरू झालेले प्रयत्न हेही रुग्णसंख्या वाढीला कारणीभूत आहे. रुग्ण वाढतील तशी कोविड सेंटर सुरू करण्याचा प्रशासनाचा निर्णय, तसेच गृह अलगीकरणात असलेल्या रुग्णांकडून नियमांचे पालनाकडे झालेले दुर्लक्ष यामुळेही रुग्णवाढीस हातभार लागला.

मे महिन्यात महापालिका प्रशासनाने कोरोना चाचण्यांची संख्या वाढविली आहे. संजीवनी अभियान राबवून घरोघरी जाऊन रुग्ण शोधमोहीम सुरू केली. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढल्याचा दावा महापालिका प्रशासन करत आहे. त्यांचा हा दावा खरा मानला तरी रुग्णसंख्या वाढत आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. गृह अलगीकरणातील रुग्णांवर प्रभाग सचिव पातळीवर योग्य नियंत्रण राहिले नाही, हेही वास्तव आहे.