शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीसाठी ‘विज्ञान’कडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:28 IST

कोल्हापूर : कोरोनामुळे रोजगार, कौशल्याभिमुख अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकडे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा अधिक ओढा असल्याचे यावर्षी दिसत आहे. त्यामुळे शहरातील विविध ...

कोल्हापूर : कोरोनामुळे रोजगार, कौशल्याभिमुख अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकडे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा अधिक ओढा असल्याचे यावर्षी दिसत आहे. त्यामुळे शहरातील विविध ३५ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीसाठी प्रवेश क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले. त्यातही विज्ञान विद्याशाखेतून बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन पुढे वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्याचा विचार विद्यार्थी, पालकांनी केला आहे. त्यामुळे यंदा अधिकतर विद्यार्थ्यांचा विज्ञान विद्याशाखेतून अकरावी करण्याकडे अधिक कल आहे. या विद्याशाखेतून पहिल्या फेरीत २१५६ विद्यार्थ्यांनी प्रवेशनिश्चिती केली आहे.

या समितीने पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी ७३५६ विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केली होती. त्यापैकी एकूण ४२११ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. प्राधान्यक्रम दिलेले आणि हवे असणारे महाविद्यालय मिळाले नसल्याने उर्वरित ३१४५ जणांनी प्रवेश घेतले नाहीत. त्यामुळे रिक्त राहिलेल्या १०४६९ जागांवरील प्रवेशासाठी केंद्रीय समितीने दुसऱ्या फेरीची प्रक्रिया शुक्रवारी सुरू केली. त्याअंतर्गत नव्याने अर्ज करणे, अर्जात बदल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामध्ये एकूण ८३६ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज दाखल केले. त्यात काहींनी नवीन अर्ज, तर काही विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये बदल केले आहेत. दाखल झालेल्या एकूण अर्जांपैकी विज्ञान विद्याशाखेचे ५२० अर्ज, वाणिज्य मराठीचे ११२, वाणिज्य इंग्रजीसाठी १६३, कला मराठी माध्यमासाठी ३५, तर कला इंग्रजी माध्यमासाठी सहा अर्ज दाखल झाले आहेत. त्यांच्या छाननीची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली असून, निवड यादी तयार करण्याची प्रक्रिया सध्या समितीकडून सुरू आहे.

निवड यादीची उद्या प्रसिद्धी

प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची निवड यादी उद्या, शनिवारी (दि. २५) शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रसिद्ध केली जाणार आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी त्या दिवसापासून मंगळवार (दि. २८) पर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करायचे केंद्रीय समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी सांगितले.

प्रतिक्रिया

वैद्यकीय, अभियांत्रिकी, आदी क्षेत्रात करिअर करता येईल असा विचार पालक, विद्यार्थी करीत आहेत. त्यामुळे यावर्षी अधिकतर विद्यार्थ्यांचा विज्ञान विद्याशाखेकडे कल असल्याचे दिसून येत आहे.

-पी. एस. जाधव, उपप्राचार्य, कमला कॉलेज

आकडेवारी दृष्टिक्षेपात

एकूण प्रवेश क्षमता : १४६८०

समितीकडे दाखल अर्ज : ९८१०

प्रवेशासाठी पात्र अर्ज : ९७२६

व्यवस्थापन कोट्यांतर्गत प्रवेशित विद्यार्थी : ३६६

पहिल्या फेरीत प्रवेशासाठी निवड झालेले विद्यार्थी : ७३५६

या फेरीत प्रवेश निश्चित केलेले विद्यार्थी : ४२११

दुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी असणारे विद्यार्थी : ५२७८

पहिल्या फेरीतील प्रवेशनिश्चिती

विज्ञान : २१५६

वाणिज्य मराठी : ७५४

वाणिज्य इंग्रजी : ६२९

कला मराठी : ६२२

कला इंग्रजी : ५०