धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 17:09 IST2025-09-05T16:50:53+5:302025-09-05T17:09:47+5:30

Kolhapur Boy Heart Attack: कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली येथे एका दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली.

Ten-year-old boy dies of heart attack, lays head on mother's lap and dies | धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली या गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली. तो दहा वर्षीय मुलगा अन्य मुलांसोबत गणेश मंडळाच्या मंडपात बसला होता. दंगा मस्ती केल्यानंतर तो घरी गेला. आईच्या मांडीवर जाऊन त्याने डोक टेकवला. आईच्या मांडीवरच त्याने जीव सोडला. या मुलाचे नाव श्रावण गावडे असे आहे. या घटनेने सूप्ण परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मित्रांसोबत गणेश मंडळाच्या मंडपात श्रावण गावडे हा खेळत होता. अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तो मध्येच खेळ सोडून आपल्या आईच्या कुशीत जाऊन झोपला. मात्र, आईच्या मांडीवर डोके टेकवले आणि  श्रावणला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्याच्या आईला काही कळण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. 

अचानक मुलाने हालचाल थांबवल्याने आईला लक्षात आले. आईने जागीच हंबरडा फोडला. शेजाऱ्यांनी घटनास्थळ गाठत मुलाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून श्रावणचे निधन झाल्याचे स्पष्ट केले .

चार वर्षापूर्वी श्रावणच्या बहिणीचाही मृत्यू झाला होता. आता श्रावणच्या मृत्यूने गावडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

Web Title: Ten-year-old boy dies of heart attack, lays head on mother's lap and dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.